नवी दिल्ली : कोरोना व्हायरस (Corona Virus) मुळे जगभरात अनेकांनी आपला जीव गमावला. कोरोनापासून वाचण्यासाठी कोरोनाची लस देखील तयार झाली. पण यापेक्षा ही खतरनाक अदृश्य अशा गोष्टी समोर येत असतात. ही गोष्ट म्हणजे वायू प्रदूषण (Air Pollution). वायू प्रदूषणामुळे दरवर्षी १.६ मिलियन लोकांचा मृत्यू होतो. ही गोष्ट गर्भात वाढणाऱ्या गर्भासाठी म्हणजे बाळासाठी अतिशय धोकादायक असतात.
रिसर्चमध्ये धक्कादायक बाब समोर आली आहे की, वायु प्रदूषणामुळे दक्षिण आशियात सर्वाधिक प्रमाणात गर्भपात (Miscarriage) होत आहेत. रिसर्च द लांसेट प्लेनेटरी हेल्थ (Lancet Planetary Health) मध्ये संशोधन प्रकाशित झालं आहे.
रिसर्चनुसार, वायू प्रदूषण हे दक्षिण एशियातील गर्भपाताचे मुख्य कारण आहे. पाकिस्तान आणि बांग्लादेशमध्ये वायू प्रदूषणामुळे जवळपास ३,५०,००० बाळांचा गर्भपातच मृत्यू झाला आहे. यामधील ६७% घटना या ग्रामीण क्षेत्रातच घडल्याच्या समोर आल्या आहेत.
रिसर्चनुसार दक्षिण एशियात १५ मधील एक गर्भपात हे वायूप्रदूषणामुळेच होत आहे. प्रदूषित हवेमुळे मुलांचा जन्मा अगोदरच जीव जात आहे. गर्भातच बाळाला अखेरचा श्वास घ्यावा लागत आहे.
हवेतील घातकाचे प्रमाण हे PM2.5 कण आहे. ज्याची महत्वाची कारणे आहेत शेती, औद्योगिक क्षेत्र, लाकडाचे ज्वलन आणि वाहनांमधून निघणारा धुर. PM2.5 कण अतिशय हानिकारक आहे. मात्र गर्भात असलेल्या बाळासाठी ही अतिशय धोक्याची बाब आहे.