Aging Causes : आपल्या सगळ्यांनाच असं वाटतं असतं की आपला चेहरा लवकर एजेड (म्हातारा) दिसायला नको. आपल्या चेहऱ्यावर वयाच्या 40 नंतर जरा का सुरकुत्या दिसायला लागल्या तर आपले टेंशन हे वाढू लागते. तेव्हा अशावेळी काय करावे हे आपल्याला कळत नाही. आपण अनेकदा काळजीतही पडतो. परंतु काही वाईट सवयींमुळेही आपल्याला असा त्रास होऊ शकतो. आपल्याला जर का 'या' 7 वाईट सवयी असतील तर आपण वेळीच सावध होणे हे गरजेचे आहे कारण नाहीतर आपल्या चेहऱ्यावर वयाआधीच सुरकुत्या दिसू शकतात. त्यामुळे अशावेळी आपल्याला आपली जीवनशैली बदलणे फार आवश्यक आहे. नाहीतर आपल्याला त्याचा विपरीत परिणाम भोगावा लागू शकतो. त्यामुळे आपल्याला आपल्या जीवनशैलीत चांगल्या सवयी आणणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया की नक्की आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे हे आवश्यक आहे.
सध्या आपलं आयुष्य हे सध्या विविध आव्हांनी भरलेले आहे. त्यामुळे रोज आपल्यासाठी एक वेगळाच टास्क असतो. त्यातून आपल्याला आपल्या खाण्यापिण्याकडेही लक्ष देणे हे फार जास्त गरजेचे असते आपण जर का आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष दिले नाही. तर आपल्यालाही विविध रोग होण्याची शक्यता असते. त्यामुळे रोज व्यायाम आणि रोजच्या रोज योग्य आहार खासकरून पोषक आहार घेणे हे आपल्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला जर का असं वाटतं असेल की आपल्याला चेहऱ्यावर वयाच्या आधीच सुरकुत्या येऊ लागल्या आहेत. त्यामुळे आपल्यालाही त्याची फार भिती वाटू लागते. वयाच्या आधीच आपण म्हातारे होतोय की काय अशी प्रत्येकालाच चिंता लागून राहिलेली असते. त्यामुळे अशावेळी काय करावं हा प्रश्न आपल्याला कायमच पडलेला असतो. परंतु Prevention is Better Than Cure या हिशोबानं आपण योग्य ती काळजीही घेऊ शकतो.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)