Winter Tips : 99 टक्के लोकांना माहित नाही, हिवाळ्यातील कुठल्या वेळेतील ऊन आपल्या शरीरासाठी फायदेशीर?

Winter Tips : गारेगार थंडीत कोवळ्या उन्हाची मजाच काही औरच असते. पण हिवाळ्यात 99 टक्के लोकांना माहित नाही थंडीत किती वाजेपर्यंत ऊन घ्यावं...

नेहा चौधरी | Updated: Dec 2, 2023, 12:09 PM IST
Winter Tips : 99 टक्के लोकांना माहित नाही, हिवाळ्यातील कुठल्या वेळेतील ऊन आपल्या शरीरासाठी फायदेशीर? title=
99 percent of people don t know what time to sunbathe in winter for vitamin D winter health tips

Winter Tips : हिवाळीची चाहुल लागली आहे. राज्यातील महाबळेश्वर, नाशिक शहरात गुलाबी थंडी पडायला सुरुवात झाली आहे. धुक्याची चादर सर्वत्र पाहिला मिळत आहे. अशात गारेगार थंडीत कोवळ्या उन्हाची मजाच औरच असते. खरं तर अनेक ठिकाणी हिवाळ्यात सूर्याचं दर्शन होतं नाही. पण जेव्हा सूर्यदेव येतो तेव्हा गुलाबी थंडीत तो सर्वांच हवा हवासा वाटतो. इतर वेळी नकोसा वाटणारा सूर्य हिवाळ्यात आपल्याला दिसाला देतो. या सूर्यप्रकाशातून आपल्याला व्हिटॅमिन डी मिळतो. पण हिवाळ्यात कोणत्या वेळी आणि किती वेळ उन्हात बसल्यास आपल्याला व्हिटॅमिन डी मिळतं हे माहिती आहे का? (99 percent of people don t know what time to sunbathe in winter for vitamin D winter health tips)

कुठल्या वेळेतील ऊन आपल्या शरीरासाठी फायदेशीर?

हे प्रत्येकाला माहिती आहे आपल्या शरीराला फायदेशीर असलेले व्हिटॅमिन डी (vitamin D) हे सूर्यप्रकाशातून आपल्याला मिळतं. हिवाळ्यात सूर्यदेवाचं दर्शन क्वचित होतं. त्यात गारेगार थंडीमुळे आपण उशिरा उठतो. घरातून बाहेर पडावसं वाटतं नाही. मग अशावेळी आपण अनेक वेळा चुकीच्या वेळी उन्हाचा आनंद घेण्यास जातो. आज आपण जाणून घेणार आहोत की, हिवाळ्यात नेमकं कुठल्या वेळेतील ऊन हे आपल्याला शरीरासाठी चांगल आहे. 

जर तुम्हाला सकाळी व्हिटॅमिन डी (vitamin D) घ्यायचं असेल तर तुम्ही सकाळी 8 वाजता ऊन्हाचा आनंद घ्या. पण फक्त 25 ते 30 मिनिटे सूर्यप्रकाश व्हिटॅमिन डीसाठी घ्यावे. यावेळीतील व्हिटॅमिन डी चांगले उपलब्ध असतं.  

संध्याकाळ कोणती वेळ?

संध्याकाळी सूर्यप्रकाशापासून व्हिटॅमिन डी (vitamin D) घ्यायचे असेल तर तुम्हाला हे जीवनसत्व सूर्यास्ताच्या वेळी योग्य आहे. 

Sunbathe चे फायदे

व्हिटॅमिन डी 

ऊन अर्थात सूर्यप्रकाशात थोडा वेळ घालवण्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. यातील सर्वात महत्वाचे व्हिटॅमिन डी (vitamin D) तुम्हाला मिळतात. आजच्या काळात अनेक लोक व्हिटॅमिन डीच्या कमतरतेने त्रस्त असताना सूर्यप्रकाशात काही क्षण घालवल्याने तुमची ही समस्या दूर होते. त्याशिवाय शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत होते. 

सूर्यप्रकाशातून UVA मिळते

सूर्यप्रकाशामुळे आपल्याला शरीराला UVA मिळतो. ज्यामुळे आपल्या शरीरातील रक्त प्रवाह सुधारण्यास मदत होते. याशिवाय रक्तातील ग्लुकोजची पातळीही यामुळे सुधारते.  

झोपेसाठी चांगले

जर तुम्हाला झोपेचा त्रास होत असेल तर सूर्यप्रकाश तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. सूर्यप्रकाशात मेलाटोनिन नावाचा हार्मोन असतो, ज्यामुळे तुम्हाला गाढ झोप येण्यास मदत होते. 

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)