लघवीमध्ये दिसणारी 'ही' 5 लक्षणे सांगतात किडनीची डॅमेज अवस्था, गंभीर इन्फ्केशन पसरलंय

Kidney health:  किडनीशी संबंधित अनेक लक्षणे लघवीमध्येही दिसू शकतात. खास करुन जर मूत्रपिंडात संसर्ग सुरू झाला असेल, तर अनेक लक्षणे लघवीमध्ये दिसू शकतात, ज्याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नये.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Sep 1, 2024, 04:04 PM IST
लघवीमध्ये दिसणारी 'ही' 5 लक्षणे सांगतात किडनीची डॅमेज अवस्था, गंभीर इन्फ्केशन पसरलंय title=

मूत्रपिंडाचा संसर्ग, ज्याला वैद्यकीय भाषेत पायलोनेफ्रायटिस म्हणतात, हा एक प्रकारचा मूत्रमार्गाचा संसर्ग (यूटीआय) आहे जो किडनीपर्यंत पोहोचतो. जेव्हा बॅक्टेरिया किंवा विषाणू मूत्रमार्गाद्वारे मूत्रपिंडात प्रवेश करतात तेव्हा मूत्रपिंडात जळजळ आणि संसर्ग होतो. मूत्रमार्ग आणि मूत्राशयात जिवाणूंची अतिवृद्धी होते आणि हे जीवाणू मूत्रवाहिनीद्वारे मूत्रपिंडात पोहोचतात तेव्हा मूत्रपिंडाचा संसर्ग होतो. किडनी स्टोनमुळे संक्रमण देखील होऊ शकते कारण ते लघवीच्या प्रवाहात अडथळा आणू शकते. त्यामुळे ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे अशा लोकांना किडनी संसर्गाचा धोका जास्त असतो. किडनीच्या संसर्गादरम्यान लघवीमध्ये दिसणारी लक्षणे ओळखणे गरजेचे आहे. जेणेकरून वेळेवर उपचार करता येतील. या काळात, प्रोस्टेट ग्रंथी वाढणे यासारख्या लघवीच्या प्रवाहात अडथळा आणल्यास देखील संसर्ग होऊ शकतो. आज 5 लक्षणे पाहणार आहोत. जी लक्षणे किडनी डॅमेज होत असल्याच सांगतात. 

लघवी करताना जळजळ 

कधीकधी लघवी करताना तीव्र जळजळ जाणवते आणि लघवी करताना तीव्र जळजळ किंवा वेदना जाणवत असेल तर ते मूत्रपिंडाच्या संसर्गाचे लक्षण असू शकते. या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका, विशेषत: ते कायम राहिल्यास. हे लक्षण वेळीच ओळखून, तुम्ही किडनीचा संसर्ग होण्याआधीच टाळू शकता.

लघवीचा रंग गडद होणे

जर तुमचे लघवी सामान्यपेक्षा जाड, ढगाळ दिसत असेल तर ते संसर्गाचे लक्षण असू शकते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. जर लघवी घट्ट, ढगाळ किंवा अत्यंत पिवळसर होत असेल तर ताबडतोब डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या.

लघवीचा वास 

तुमच्या लघवीला वास येणे हे सामान्य असले तरी, तुमच्या लघवीला नेहमीपेक्षा तीव्र किंवा असामान्य वास येत असेल, तर ते किडनीच्या संसर्गाचेही लक्षण असू शकते. त्यामुळे या गडाकडे दुर्लक्ष करू नका, ते तुम्हाला अडचणीत आणू शकते.

लघवीतून रक्त येणे 

मूत्रात रक्त येणे हे मूत्रपिंडाच्या संसर्गाचे सर्वात गंभीर लक्षण आहे. ज्याकडे तुम्ही कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्ष करू नये. लघवीमध्ये गुलाबी, लाल किंवा तपकिरी रंगाचे रक्त दिसले तर ते एक गंभीर लक्षण आहे आणि ताबडतोब काळजी घेणे आवश्यक आहे.

सतत लघवीला होणे 

जर तुम्हाला वारंवार लघवी करण्याची गरज वाटत असेल, परंतु प्रत्येक वेळी खूप कमी प्रमाणात लघवी येत असेल, तर हे देखील किडनीच्या संसर्गाचे लक्षण असू शकते. मूत्रपिंडाच्या संसर्गाच्या बाबतीत, प्रामुख्याने ही लक्षणे प्रथम दिसतात, म्हणून आपण ते ओळखू शकता आणि अगदी सौम्य लक्षणे दिसल्यास डॉक्टरांकडून तपासणी करून घेऊ शकता.

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)