या ५ फळांच्या सेवनाने तुम्ही व्हाल हेल्दी आणि सुंदर!

उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

Updated: Apr 17, 2018, 07:44 PM IST
या ५ फळांच्या सेवनाने तुम्ही व्हाल हेल्दी आणि सुंदर! title=

मुंबई : उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. कारण थोडीशी हेळसांडही नुकसानकारक ठरू शकते. त्यामुळे आहाराकडे नीट लक्ष देणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात फळं, दही, लस्सी, ताक, हिरव्या पालेभाज्या यांचे अधिक सेवन करा. पण उन्हाळ्यात फळांचे सेवन करणे अधिक महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे डिहायड्रेशन होत नाही. प्रत्येक हंगामी फळांचे वेगवेगळे फायदे असतात. ही फळे स्वास्थ्यपूर्ण असण्याबरोबरच सौंदर्यवर्धकही असतात.

काकडी

काकडी शरीराला थंडावा देते. त्यात कॅलरीज खूप कमी असतात. त्याचबरोबर यात फायबर आणि अँटी ऑक्सीडेंट असतात. त्यामुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते व रक्तदाबही नियंत्रित राहतो. म्हणून उन्हाळ्यात काकडीचे सेवन नक्की करा.

टरबूज

टरबूज खास करुन हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यामुळे वजनही कमी होते. हृदयासंबंधित आजार दूर होतात. टरबूजात पोटॅशियम, व्हिटॉमिन ए आणि व्हिटॉमिन सी असते.

नारळपाणी

नारळपाणी डिहाड्रेशनसोबत अनिद्रा, मधुमेह, पोटांचे विकार यावर उत्तम ठरते. नारळपाणी हे एक नैसर्गिक पेय असून त्यात प्राकृतिक साखर, व्हिटॉमिन्स, मिनरल्स, इलेक्ट्रोलाईट्स, एन्झाईम्स, अमिनो अॅसिड आणि फायटो हार्मोन्स असतात. त्यामुळे आरोग्यास फायदा होतो.

लिची

लिची शरीराला थंडावा देतो आणि त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. त्याचबरोबर लीचीचे अनेक फायदेही आहेत. लीचीत सायट्रिक अॅसिड, व्हिटॉमिन्स, टार्टरिक अॅसिड इत्यादी पोषकघटक असतात.

पेरू

पेरू मधुमेहासाठी फायदेशीर असतो. त्यामुळे शरीरात हार्मोन्सचे संतुलन सुरळीत होते. बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. मेंदूला तरतरी येते. यात व्हिटॉमिन ए, फोलेट, पोटॅशियम, मॅगनीज असते. त्याचबरोबर फायबर आणि व्हिटॉमिन सी उत्तम प्रमाणात असतात.