मुंबई : आपण जेव्ह तणावात असतो तेव्हा शरीराला पोषकघटकांची अधिक गरज असते. सुकामेवा, भाज्या, ब्लूबेरी, मासे, अंजीर, दही आणि केळे यांसारख्या अंटीऑक्सीडेंटयुक्त आहारत तणाव दूर करण्याची क्षमता असते. त्याचबरोबर काही हेल्दी ड्रिंक्सही तणावापासून आराम देतात. पाहुया असेच काही हेल्दी ड्रिंक्स...
त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते. यात अंटीऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात असल्याने तणाव कमी होतो. टॉमेटो व्हिटॉमिन ए, के आणि सी त्याचबरोबर पोटॅशियमचा उत्तम स्त्रोत आहे. गाजरातही व्हिटॉमिन ए, सी आणि फायबर्स मुबलक प्रमाणात असतात.
पपईमध्ये कॅरोटीनॉड्स नावाचे अंटीऑक्सीडेंट असते. व्हिटॉमिन सी युक्त पपईतील पोषकतत्त्व स्वास्थ्यासाठी फायदेशीर असतात.
चहात अंटी इनफ्लामेटरी, अंटीऑक्सीडेंट, पचन, उत्तेजक आणि तणाव दूर करणारे गुण असतात. हार्मोन संतुलनात मदत करुन तणाव कमी करण्यास आणि चिंता दूर करण्यास हा चहा उत्तम ठरतो.
ताकामुळे ताणाचे प्रमाण कमी होते. तणाव हार्मोनचे प्रमाण संतुलित करण्यासाठी मदत होते. ताकात पचनाला मदत करणारे अनेक बॅक्टेरीया असतात. त्यामुळे कॅलरीज कमी होऊन शरीराचे चांगले पोषण होते.
ब्लूबेरी तणाव कमी करण्यास मदत करते. ब्लूबेरीत अंटीऑक्सीडेंट, व्हिटॉमिन सी असते. त्यामुळे तणाव कमी करण्यास मदत होते.
आल्यात अंटीऑक्सीडेंट असतात. तणावाच्या काळात शांत राहण्यासाठी आलं फायदेशीर ठरतं. लिंबू व्हिटॉमिन सी ने युक्त असते. त्यामुळे लगेचच ऊर्जा, शक्ती प्रदान केली जाते.