थायरॉईडमध्ये औषधांपेक्षा ही 5 फळे गुणकारी, हार्मोन्सला कंट्रोलमध्ये ठेवतात

Fruits For Thyroid:थायरॉईडच्या समस्येवर काही फळांचे सेवन खूप फायदेशीर ठरू शकते.  जाणून घेऊया या फळांबद्दल.  

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jan 6, 2024, 12:30 PM IST
थायरॉईडमध्ये औषधांपेक्षा ही 5 फळे गुणकारी, हार्मोन्सला कंट्रोलमध्ये ठेवतात title=

Thyroid Prevent Fruits :  सध्या लोकांमध्ये थायरॉईडची समस्या सामान्य झाली आहे. थायरॉईड ही फुलपाखराच्या आकाराची एक छोटी ग्रंथी आहे जी आपल्या गळ्यात असते. ही ग्रंथी थायरॉक्सिन संप्रेरक तयार करते, जे शरीरातील चयापचय दर, वाढ आणि पेशींची दुरुस्ती करण्यास मदत करते. जर हा हार्मोन नीट काम करत नसेल तर शरीरात अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. थायरॉईडच्या रुग्णांनी त्यांच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी. Healthline च्या रिपोर्टनुसार, या फळांबद्दल माहिती दिली आहे. 

सफरचंद 

रोज एक सफरचंद खाल्ल्याने तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता. यामध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात, जे शरीराला फ्री रॅडिकल्सपासून वाचवण्यास मदत करतात. थायरॉईडच्या रुग्णांसाठी हे खूप फायदेशीर आहे. याव्यतिरिक्त, हे वजन कमी करण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास देखील मदत करते.

पेरू

पेरू फक्त खाण्यासच स्वादिष्ट नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी9, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ई, फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि ओमेगा-3 फॅटी अॅसिड सारखे पोषक घटक असतात. याच्या सेवनाने थायरॉइडच्या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. याशिवाय अॅनिमिया आणि डायबिटीजच्या समस्येवरही हे फायदेशीर आहे.

संत्र 

थायरॉईडच्या रुग्णांसाठी संत्र्याचे सेवन खूप फायदेशीर आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासोबतच थायरॉईड ग्रंथीतील सूजही कमी करते. संत्र्याचे नियमित सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे मिळू शकतात.

बेरीज 

बेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, जे ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून पेशींचे संरक्षण करण्यास मदत करतात. ते थायरॉईड संप्रेरकांचे उत्पादन वाढवण्यास आणि वजन कमी करण्यास देखील मदत करतात. थायरॉईडचे रुग्ण त्यांच्या आहारात स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी आणि रास्पबेरी समाविष्ट करू शकतात.

किवी 

थायरॉईडच्या रुग्णांसाठी किवीचे सेवन फायदेशीर आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात. याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास आणि थायरॉईड नियंत्रित ठेवण्यास मदत होते. हे हृदय निरोगी ठेवण्यासाठी देखील उपयुक्त आहे. याच्या नियमित सेवनाने वजन कमी करण्यासही मदत होते.

ही फळे तुमच्या दिवसभराच्या डाएटमध्ये सहभागी करुन घ्या. यातील अनेक फळे ऋतुनुसार मिळतात. त्या त्या वेळेनुसार तुम्ही आहारात या फळांचा समावेश करु शकता. फळांचे सेवन केल्यावर तुमच्या शरीरातील थायरॉईडची समस्या दूर होण्यास  मदत होते.