शिल्पा-रितेशचा झिंगाट डान्स!

निर्माती-दिग्दर्शक फराह खान सध्या 'लिप सिंग बॅटल' हा रिअॅलिटी शो होस्ट करतेय. नुकतीच या कार्यक्रमात अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि रितेश देशमुख यांनी हजेरी लावली.

Updated: Sep 27, 2017, 06:15 PM IST
शिल्पा-रितेशचा झिंगाट डान्स! title=

मुंबई : निर्माती-दिग्दर्शक फराह खान सध्या 'लिप सिंग बॅटल' हा रिअॅलिटी शो होस्ट करतेय. नुकतीच या कार्यक्रमात अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि रितेश देशमुख यांनी हजेरी लावली.

यावेळी शिल्पा आणि रितेशने आपल्या खास अंदाजात झिंगाट डान्स करून खूप धमाल उडवली... आणि शो अधिकच मनोरंजक झाला. फराह, शिल्पा आणि रितेशनं हे शूट किती एन्जॉय केलं ते त्यांच्या ट्विटवरूनच दिसतंय. 

झिंगाट गाण्यावर डान्स केल्यावर रितेश देशमुखने लिप सिंग बॅटलचं चॅलेंज घेत मिथुन चक्रवर्तींच्या 'जिते हैं हम शान से' चित्रपटातल्या 'जुली जुली' गाण्यावर परफॉर्मन्स दिला. मिथुनदाच्या गेटअपमध्ये परफॉर्म करून रितेशने प्रेक्षकांची मनं जिंकली.
 

एवढंच नाही, तर शिल्पा शेट्टीनेही लिप सिंग बॅटलचे चॅलेंज घेत, अमिताभ बच्चन यांचा गेटअप केला... आणि बिग बींच्या 'हम' चित्रपटातल्या लोकप्रिय 'जुम्मा चुम्मा दे दे' ह्या गाण्यावर परफॉर्म केले. शिल्पा शेट्टी महानायक अमिताभ बच्चन स्टाइलमध्ये डान्स करत असतानाच फराह खान बनली किमी काटकर... आणि दोघींनी मिळून परफॉर्म करून धमाल उडवून दिली.