मुंबई : देशभरात 'लव जिहाद' हा कायमच मोठा मुद्दा राहिला आहे. या मुद्यावरून होणारा वाद काही नवीन नाही. मध्यप्रदेश सरकारने याबाबत मोठा निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत. गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे की,'विधानसभेत लव जिहादबाबत विधेयक आणण्यात येणार आहे. लव जिहादवर ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात येणार आहे.' गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्या या निर्णयावर बॉलिवूड अभिनेता जीशान अय्यूबसह अनेक कलाकारांना ही गोष्ट पटलेली नाही.
झिशानने सोशल मीडियावर विरोध दर्शवला आहे. जीशान अय्यूबने या प्रकरणावर ट्विट केलं आहे. त्याने लिहिलंय की,'प्रेम केल्यावर कारागृहात जावं लागेल. किंवा प्रेम करण्याअगोदर धर्म पाहावा लागेल.'
प्यार करने पर जेल जाना पड़ेगा!!!
या प्यार करने से पहले धर्म देखना पड़ेगा!!!
घबराइए मत, नफ़रत करने पर कोई नहीं टोकेगा, बल्कि तालियाँ बजाईं और बजवाईं जाएँगी
#lovejihaad जैसे झूठ पर क़ानून बनाया जा रहा है! वाह साहेब वाह!!! https://t.co/7IgbrGh5vG— Mohd. Zeeshan Ayyub (@Mdzeeshanayyub) November 17, 2020
प्यार करने पर जेल जाना पड़ेगा!!! या प्यार करने से पहले धर्म देखना पड़ेगा!!! घबराइए मत, नफ़रत करने पर कोई नहीं टोकेगा, बल्कि तालियाँ बजाईं और बजवाईं जाएँगी!!Clapping hands signClapping hands signClapping hands sign #lovejihaad जैसे झूठ पर क़ानून बनाया जा रहा है! वाह साहेब वाह!!!
झिशान अय्यूब सध्या आपल्या सिनेमामुळे चर्चेत आहे. झिशान राजकुमार राव यांच्या अपोझिट दिसणार आहे. सिनेमात झिशानच्या अभिनयाला खूप छान प्रतिसाद मिळतो.