झी टॉकीजवर 'मांजा' चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

 मराठी चित्रपट प्रसारित करणारी एकमेव लोकप्रिय वाहिनी झी टॉकीज एका दशकापेक्षा जास्त प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे. या वाहिनीने फक्त सदाबहार आणि नवनवीन सिनेमेच प्रसारित केले नाहीत तर म्युजिक, कॉमेडीआणि मराठी नाटकांशी संबंधित लक्षवेधक शो टिव्हीवर सादर करून प्रेक्षकांना त्यांच्या टिव्ही स्क्रिनला खिळवून ठेवले आहे. कम्प्लिट एंटरटेनमेंट पॅकेज असलेल्या झी टॉकीज वाहिनीला प्रेक्षकांचं प्रेम आणि अखंड पाठिंबा मिळतआला आहे.

झी टॉकीजवर 'मांजा' चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर title=

मुंबई : मराठी चित्रपट प्रसारित करणारी एकमेव लोकप्रिय वाहिनी झी टॉकीज एका दशकापेक्षा जास्त प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे. या वाहिनीने फक्त सदाबहार आणि नवनवीन सिनेमेच प्रसारित केले नाहीत तर म्युजिक, कॉमेडीआणि मराठी नाटकांशी संबंधित लक्षवेधक शो टिव्हीवर सादर करून प्रेक्षकांना त्यांच्या टिव्ही स्क्रिनला खिळवून ठेवले आहे. कम्प्लिट एंटरटेनमेंट पॅकेज असलेल्या झी टॉकीज वाहिनीला प्रेक्षकांचं प्रेम आणि अखंड पाठिंबा मिळतआला आहे.
 
येत्या रविवारी झी टॉकीजवर 'मांजा' या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर असणार आहे. अश्विनी भावे यांचा दमदार अभिनय असलेल्या मांजा या चित्रपटात सुमेध मुद्गलकर आणि बालक पालक फेम रोहित फाळके यांनी देखीलत्यांच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांना अचंबित केले. थ्रिलर शैलीचा मांजाचे कथानक नव्याने जीवन सुरू करणाऱ्या आई व मुलाभोवती फिरते. तीनही पात्रांचा जबरदस्त परफॉर्मन्स प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यात यशस्वी झालाआहे.

एक मानसिक थरारपट असलेला मांजा बॉक्स ऑफिसवर चांगला चालला कारण प्रेक्षक या चित्रपटाशी रिलेट करू शकले. मांजाचा युएसपी हा आहे की त्यातील पात्रे त्यांच्या मूळ प्रवृत्तींशी सुसंगत वागतात आणि त्यामुळे हीकथा जास्त सशक्त झाली आहे.  
तर मग ‘मांजा'चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर पहायला विसरू नका. १५ एप्रिल रोजी दुपारी १२.०० वाजता आणि संध्या. ७.०० वाजता फक्त झी टॉकीज वर