'सांस्कृतिक कालादर्पण'मध्ये 'झी २४ तास'चा डंका; ठरली सर्वोत्कृष्ट वृत्तवाहिनी

मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा कलाक्षेत्रात पडद्यावर आणि पडद्यामागे आपले अमूल्य योगदान देणाऱ्या मान्यवरांना ‘सांस्कृतिक कलादर्पण गौरवरजनी पुरस्कारा’ने दरवर्षी गौरवण्यात येतं. यंदाचा पुरस्कार नुकताच पार पडला असून ''सर्वात्कृष्ट न्यूज चॅनल'' या नामांकनात झी २४ तासला हा पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. '

Updated: May 24, 2024, 04:44 PM IST
'सांस्कृतिक कालादर्पण'मध्ये 'झी २४ तास'चा डंका; ठरली सर्वोत्कृष्ट वृत्तवाहिनी title=

मुंबई : सांस्कृतिक कालादर्पण गौरव रजनी २०२४ हा भव्य दिव्य पुरस्कार सोहळा २३ मे २०२४ रोजी सायं.६.३० वा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी विविध विभागातील नाटक, सिने आणि संगीत विभागात पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 

मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा कलाक्षेत्रात पडद्यावर आणि पडद्यामागे आपले अमूल्य योगदान देणाऱ्या मान्यवरांना ‘सांस्कृतिक कलादर्पण गौरवरजनी पुरस्कारा’ने दरवर्षी गौरवण्यात येतं. यंदाचा पुरस्कार नुकताच पार पडला असून ''सर्वात्कृष्ट न्यूज चॅनल'' या नामांकनात झी २४ तासला हा पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. 'सर्वात्कृष्ट न्यूज चॅनल'' हा पुरस्कार 'झी २४ तास'चे कार्यकारी संपादक, कमलेश सुतार आणि 'झी २४ तास'च्या इनपुट हेड मिताली मठकर यांनी हा पुरस्कार स्विकारला. 'झी २४ तास' या वृत्त वाहिनीला सर्वोत्कृष्ट न्यूज चॅनल या पुरस्काराने  सन्मानित करण्यात आलं आहे.

महाराष्ट्राची संस्कृती जपण्याकरिता आणि समाजात मौल्यवान योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि समुदायांना प्रोत्साहन देण्याचे प्रशंसनीय कार्य चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान मागील अनेक वर्षांपासून करत आहे. आजवर अनेक दिग्गजांना या संस्थेच्या वतीने गौरवण्यात आला आहे. या वर्षीच्या पुरस्कार सोहळ्याचे प्रक्षेपण लवकरच तुम्हाला ‘सन मराठी’वाहिनीवर पाहता येणार आहे. संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

याव्यतिरिक्त अन्य मान्यवरांनाही यावेळी त्यांच्या विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्कार देण्यात येणार आहेत. चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत यंदाचा ‘सांस्कृतिक कलादर्पण गौरवरजनी पुरस्कार सोहळा 2024’ येत्या नुकताच मुंबईत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहमध्ये पार पडला आहे. या सोहळ्याला अनेक कलावंतांनी हजेरी लावली होती.