'अल्लाह फक्त मृत्यू दे', एमसी स्टॅनच्या पोस्टनं चाहत्यांना बसला धक्का, ब्रेकअपनंतर अशी झाली रॅपरची अवस्था

Mc Stan Post Leaves Fans Scared And Shocked : 'बिग बॉस 16' फेम एमसी स्टॅनच्या पोस्टनं वेधलं सगळ्यांचं लक्ष...

दिक्षा पाटील | Updated: May 24, 2024, 04:15 PM IST
'अल्लाह फक्त मृत्यू दे', एमसी स्टॅनच्या पोस्टनं चाहत्यांना बसला धक्का, ब्रेकअपनंतर अशी झाली रॅपरची अवस्था title=
(Photo Credit : Social Media)

Mc Stan Post Leaves Fans Scared And Shocked : 'बिग बॉस 16' चा विजेता आणि लोकप्रिय रॅपर एमसी स्टॅन सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. एमसी स्टॅननं अल्लाहला मृत्यू दे असं म्हटलं आहे. एमसी स्टॅनची ही पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. एमसी स्टॅननं काही दिवसांपूर्वी ब्रेकअपविषयी एक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये त्यानं गर्लफ्रेंड बूबासोबत ब्रेकअप झाल्याचे सांगितले. तेव्हा पासून तो दु: खात असल्याचं म्हटलं जातंय. पण या सगळ्यात आता एमसी स्टॅननं अल्लाहकडे मृत्यूची मागणी केली आहे. 

एमसी स्टॅननं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं अल्लाह फक्त मृत्यू दे असं म्हटलं आहे. एमसी स्टॅनची ही पोस्ट पाहिल्यानंतर कोणालाही कळत नाही आहे की त्यानं अशी पोस्ट का केली आहे? त्याच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे की तो चिंतेत आहे किंवा मग तो हार्ट ब्रेक अपचं दु: ख सहन करु शकत नाही आहे. 

Bigg Boss Winner Rapper Mc Stan Post Leaves Fans Scared And Shocked

एमसी स्टॅनची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यावर त्याच्या चाहत्यांनी कमेंट करत भावा काय झालं. दुसरा नेटकरी म्हणाला, 'असं काही करु नकोस' असं म्हटलं आहे. तिसरा नेटकरी म्हणाला, 'स्वतःच्या फॅन्सचा विचार कर'. 

एमसी स्टॅन गर्लयफ्रेंड बूबावर खूप प्रेम करायचा आणि अनेक वर्षांपासून तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होता. 'बिग बॉस 16' दरम्यान एमसी स्टॅन अनेकदा गर्लफ्रेंडविषयी बोलताना दिसला. दोघं लग्न करणार होते पण आता त्यांचं ब्रेकअप झालं आहे. एमसी स्टॅन 'बिग बॉस 16' मुळे चर्चेत आला होता. सलमान खानचा हा शो जिंकल्यानंतर त्याच्या लोकप्रियतेत खूप वाढ झाली आहे. 

हेही वाचा : आजीच्या वाढदिवसाला खास लूकमध्ये दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या पोस्टमध्ये अभिषेक न दिसल्यानं नेटकरी पेचात

एमसी स्टॅनच्या कामाविषयी बोलायचे झाले तर एमसी स्टॅन सलमान खानच्या प्रोडक्शन असलेल्या 'फर्रे' या चित्रपटातून एक गायक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. याशिवाय एमसी स्टॅन हा त्याच्या म्यूजिक व्हिडीओमुळे देखील चर्चेत असतो आणि तो अनेकदा रॅप करताना दिसतो. रिपोर्ट्सनुसार, एमसी स्टॅनची नेटवर्थ ही 15-20 कोटी इतकी आहे. एमसी स्टॅनचे इन्स्टाग्रामवर 10.9 मिलियन फॉलोवर्स आहेत.