Zaheer Iqbal talked about Shatrughan Sinha : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी 23 जून रोजी लग्न केलं. तर हे लग्न चर्चेचा विषय ठरलं होतं. वांद्रे परिसरात असलेल्या घरी त्यांनी लग्न केलं आणि बॅस्टियनमध्ये त्यांनी रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. त्यांच्या या रिसेप्शन पार्टीत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. आता सोनाक्षीनं सांगितलं की जेव्हा झहीर इक्बालनं शत्रुघ्न सिन्हा यांच्याकडे त्यांची लेक सोनाक्षी सिन्हाचीचा हात मागण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्यांची कशी रिअॅक्शन होती त्याविषयी सांगितलं आहे.
'ई टाइम्स'ला दिलेल्या एका मुलाखतीत सोनाक्षी आणि झहीरनं त्यांच्या लग्नाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. झहीरनं यावेळी सोनाक्षीला लग्नाविषयी कसं विचारलं आणि त्यानंतर तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांना त्यांच्या लग्नाविषयी कसं सांगितलं. त्यावेळी त्याची अवस्था काय झाली होती याविषयी सांगितलं आहे. झहीर इक्बालनं सांगितलं की मी त्यांच्या घरी गेलो आणि त्यावेळी मी खूप घाबरल होतो कारण त्याच्याआधी आम्ही कधीच समोरा समोर बोललो नव्हतो. ज्यावेळी आम्ही बोलायला सुरुवात केली, त्यावेळी आम्ही लाखो गोष्टींवर चर्चा करत बसलो आणि मित्रांसारखं चर्चा करत होतो.
झहीरनं पुढे सांगितलं की मी त्यांना हे देखील सांगितलं की मला त्यांना लग्नाविषयी विचारायचं आहे. मला माहित आहे की त्यांची एक रागीट माणूस अशीच ओळख निर्माण झाली, पण ते खूप चांगले, शांत स्वभावाचे आणि सगळ्यात प्रेमळ व्यक्ती आहेत. बऱ्याच काळात मी इतक्या चांगल्या आणि प्रेमळ व्यक्तीला भेटलेलो नाही.
सोनाक्षीनं पुढे सांगितलं की 'जेव्हा मी माझ्या वडिलांना आमच्याविषयी सांगितलं तेव्हा मी देखील घाबरले होते. त्यांची प्रतिक्रिया कशी असेल हे मला माहित नव्हतं. त्यामुळे मी स्वत: ला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होते. मी त्यांना विचारलं की 'तुम्हाला माझ्या लग्नाची चिंता नाही कारण तुम्ही कधीच मला त्याविषयी विचारलं नाही?' त्यांनी सांगितलं की 'मी तुझ्या आईला विचारलं की आपल्याला मुलीला विचार.'
सोनाक्षीनं पुढे सांगितलं की "मी त्यांना म्हटलं की माझ्या आयुष्यात झहीर नावाचा मुलगा आहे आणि ते म्हणाले हो मी पण हे वाचलं. ते पुढे म्हणाले, तुम्ही आता मोठे झाला आहात, जेव्हा नवरा-बायको तयार आहेत तेव्हा दुसऱ्यांचं काय?( मिया बीवी राजी तो क्या करेगा काजी'।) त्यावेळी माझं असं झालं की हे किती सोपं होतं. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की माझे वडील हे किती शांत आहेत. आमच्या नात्याला घेऊन खूप आनंदी आहेत."