मला विचारायचा 'कधी क्रीम लावली नाही का?' अक्षय कुमारवर अभिनेत्रीने केले धक्कादायक आरोप

बॉलिवूडमध्ये बॉडिशेमिंगवर सतत अनेक अभिनेत्री बोलत असतात. अनेकदा अनेक अभिनेत्री बॉडी शेमिंगवर बोलत्या होतात. आता एक अभिनेत्री यावर व्यक्त झाली आहे,

Updated: Nov 7, 2023, 04:42 PM IST
मला विचारायचा 'कधी क्रीम लावली नाही का?' अक्षय कुमारवर अभिनेत्रीने केले धक्कादायक आरोप title=

Shantipriya on Akshay Kumar : अक्षय कुमारचा मुख्य अभिनेता म्हणून पहिला चित्रपट 'सौगंध' होता. 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात तिच्या नायिकेची भूमिका साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री शांतीप्रिया हिने साकारली होती.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शांतिप्रियाने अक्षय कुमारबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत. यासोबतच अभिनेत्रीने काही वर्षांपूर्वीचा एक प्रसंगही सांगितला आहे, जेव्हा तिने अक्षयकडे मदत मागितली होती आणि सुपरस्टारने तिच्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली होती.

'इक्के पे इक्का' चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीनच्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमारने अभिनेत्रीच्या गुडघ्यांच्या रंगावर भाष्य केल्याचा आरोप शांतीप्रियाने केला आहे. अभिनेत्री म्हणाली की, "मी शॉर्ट ड्रेस घातला होता कारण माझी भूमिका एका ग्लॅमरस मुलीची होती. सगळे माझ्याकडे बघत होते. यावेळी अक्षय मला म्हणाला, शांती, तुझ्या गुडघ्याला दुखापत झाली आहे का?  मग मी माझे पाय तपासत होते. तो पुढे म्हणाला- तुझे गुडघे खूप काळे आहेत. तु तुझ्या गुडघ्यांना काही कधी क्रीम लावत नाहीस का?"
 
त्याच्या या वागणुकीमुळे  आपला अपमान झाल्याचं शांतीप्रियाने सांगितलं. मला माझ्या गुडघ्यांची कधीच चिंता नव्हती. मात्र अक्षय सगळ्यांसमोर असं बोलल्यामुळे मला खूप लाज वाटली. यासोबतच अक्षय कुमारने तिला काम मिळवून देण्याचं आश्वासन दिल्याचा आरोपही शांतिप्रियाने केला. पण नंतर त्याने तिचा विश्वासघात केला. ती म्हणाली, "मी अक्षयला सांगितलं होतं की मला अभिनयात पुनरागमन करायचं आहे. त्याने मला चांगली भूमिका मिळेल असं आश्वासन दिलं होतं. पण त्याने तसं केलं नाही. मी खूप नाराज आहे."

बॉलीवूडमध्ये बॉडी शेमिंग
बॉलीवूडमध्ये बॉडी शेमिंग ही मोठी समस्या असल्याचं शांतीप्रियाच्या आरोपावरून स्पष्ट होतं. अनेकवेळा अभिनेत्रींना त्यांच्या रंग आणि फिगरमुळे ट्रोल केलं जातं. अभिनेत्री पुढे म्हणाली- 'बॉलिवूडमध्ये बॉडी शेमिंग थांबवण्यासाठी लोकांना जागरुक करावं लागेल. प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं हे समजून घेतलं पाहिजे. आणि कुणाच्या शरीरावर भाष्य करणं योग्य नाही. आपल्याला हे देखील स्पष्ट करावं लागेल की, बॉडी शेमिंगमुळे लोकांचं मानसिक आणि भावनिक नुकसान होऊ शकतं. शांतीप्रियाच्या आरोपांमुळे बॉलिवूडमध्ये बॉडी शेमिंगची समस्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे