अजिंक्य ननावरे आणि ऋतुजा बागवेची जोडी पुन्हा जमली; नव्या सिनेमात झळकणार एकत्र

वेगवेगळ्या कथाविषयांच्या चित्रपटांमुळे आणि हटके जोड्यांमुळे अनेक मराठी चित्रपट लक्षवेधी ठरले आहेत. अभिनेत्री ऋतुजा बागवे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे ही जोडी 'सोंग्या' चित्रपटाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे. 

Updated: Nov 7, 2023, 03:32 PM IST
अजिंक्य ननावरे आणि ऋतुजा बागवेची जोडी पुन्हा जमली; नव्या सिनेमात झळकणार एकत्र title=

मुंबई : वेगवेगळ्या कथाविषयांच्या चित्रपटांमुळे आणि हटके जोड्यांमुळे अनेक मराठी चित्रपट लक्षवेधी ठरले आहेत. अभिनेत्री ऋतुजा बागवे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे ही जोडी 'सोंग्या' चित्रपटाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे. एका नाटकाच्या निमित्ताने या दोघांनी एकत्र काम केलं होतं, पण त्यांनतर एकत्र काम करण्याचा तो योग जुळून आला नाही. आता मात्र 'सोंग्या' या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने अजिंक्य आणि ऋतुजाचा एकत्र काम करण्याचा योग जुळून आला आहे.  

निरामि फिल्म्सची निर्मिती असलेला मिलिंद इनामदार दिग्दर्शित 'सोंग्या' चित्रपट  येत्या १५ डिसेंबरला  प्रदर्शित  होणार आहे. निशांत काकिर्डे, राहुल पाटील, मिलिंद इनामदार या चित्रपटाचे निर्माते आहेत. 'चित्रपटात आम्ही पहिल्यांदाच एकत्र काम केले असलं तरी याआधी नाटकात आम्ही एकत्र काम केलं असल्याने आमच्यात चांगली मैत्री आणि बॉण्डिंग होतं त्याचा फायदा आम्हांला 'सोंग्या' चित्रपटातील आमच्या भूमिका करताना नक्की झाला, अशा भावना ऋतुजा आणि अजिंक्यने व्यक्त केल्या.

सामाजिक बंधनांखाली स्त्रियांची होणारी घुसमट यावर 'सोंग्या' चित्रपट भाष्य करतो. आजही अनेक चुकीच्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात. या चुकीच्या गोष्टींविरुद्ध आवाज उठवण्याची प्रेरणा देणारा हा चित्रपट आहे. ऋतुजा बागवे, अजिंक्य ननावरे यांच्यासोबत गणेश यादव, अनिल गवस, प्रदीप डोईफोडे आदि कलाकार चित्रपटात आहेत. चित्रपटाची कथा पटकथा दिपक यादव यांची आहे.  गीतलेखन गुरु ठाकूर यांनी केले आहे. संगीत विजय गवंडे यांचे आहे. छायांकन अरविंद के.  तर संकलन निलेश गावंड यांचे आहे.

‘सोंग्या’ चित्रपटातील मुख्य भूमिकेत ऋतुजा बागवे, अजिंक्य ननावरे, गणेश यादव, अनिल गवस, प्रदीप डोईफोडे आदि कलाकार दिसणार आहेत. निशांत काकिर्डे, राहुल पाटील, मिलिंद इनामदार ‘सोंग्या’ चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाचे गीतलेखन गुरु ठाकूर यांनी केले आहे. संगीत विजय गवंडे यांचे आहे. आदर्श शिंदे, स्वप्नील बांदोडकर, मनिष राजगिरे, योगेश चिकटगावकर, स्वप्नजा लेले, अमिता घुंगरी यांचा स्वरसाज चित्रपटातील गीतांना लाभला आहे. छायांकन अरविंद कुमार तर संकलन निलेश गावंड यांचे आहे.

ऋतूजा बागवे ही आपल्या सर्वांचीच आवडती अभिनेत्री आहे. तिनं अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमधून कामं केली आहेत. त्याचसोबत तिचं 'अनन्या' हे नाटकंही प्रचंड गाजलं होतं.