'त्यानं मला श्रेय न देता...' Animal च्या दिग्दर्शकावर ट्रांसवुमन स्क्रीनराइटरचे गंभीर आरोप

Gazal Dhaliwal post on Sandeep Reddy Vanga : लेखक गजल धालीवालनं यावेळी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत संदीप रेड्डी वांगा यांच्यावर आरोप केलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Dec 22, 2023, 11:22 AM IST
'त्यानं मला श्रेय न देता...' Animal च्या दिग्दर्शकावर ट्रांसवुमन स्क्रीनराइटरचे गंभीर आरोप title=
(Photo Credit : Social Media)

Gazal Dhaliwal post on Sandeep Reddy Vanga : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि बॉबी देओल यांचा 'ॲनिमल' हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शनाच्या 20 दिवसात चित्रपटानं 630.35 कोटींची कमाई केली आहे. तर ग्रॉस प्रॉफिटविषयी बोलायचे झाले तर या चित्रपटानं 817.36 कोटींची कमाई केली. चित्रपटाला क्रिटिक्सपासून प्रेक्षकांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, काही प्रेक्षक आहेत ज्यांना हा चित्रपट आवडला नाही. त्यांनी या चित्रपटात रणबीरच्या भूमिकेवर टीका केली आहे. 

खरंतर, रणबीरनं या चित्रपटात अल्फा मेल आणि महिला विरोधी गोष्टींवर चर्चा केली आहे. त्यावरून चित्रपटावर चांगलीच चर्चा रंगली आहे. एकीकडे सगळे स्तुती करत असताना आता ट्रान्सवूमन लेखक गजल धालीवालनं एक पोस्ट शेअर करत दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांचा उल्लेख केला आहे. गजल यांच्याविषयी बोलायचे झाले तर त्यांनी 'लिपस्टिक अंडर माई बुर्का', 'चंडीगढ करे आशिकी' आणि 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' अशा अनेक चित्रपटांची पटकथा लिहिली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

गजलनं संदीप रेड्डी वांगा यांना लेखक-दिग्दर्शक-संपादक म्हणाली आहे. खरंतर स्क्रीनराइटर गजल धालीवालनं संदीप रेड्डी वांगावर आरोप केला आहे की त्यांनी चित्रपटातील पटकथा आणि डायलॉग्ससाठी इतर लेखकांना क्रेडिट्स दिले नाहीत. या पोस्टमध्ये गजल म्हणाली की, 'मला ॲनिमल पाहायला थोडा उशिर झाला आणि त्यानंतर गजलनं काही क्रिटिक्सची नावं घेतली आणि म्हणाली की 'मोठ्या क्रिटिक्सकडून आपल्या मनातील गोष्टी सांगितल्यानंतर महिला विरोधी आणि अल्फा मेलच्या अवतीभोवती फिरणाऱ्या पटकथेशिवाय काही नाही. ज्याविषयी मला एक छोटीशी गोष्ट सांगायची आहे. चित्रपटसृष्टीत असे अनेक दिग्दर्शक आहेत. जे त्यांच्या चित्रपटाच्या टॉप क्रेडिटमध्ये स्वत:ला लेखक बोलतात. तर, एकटे नसून त्यांच्यासोबत अनेक इतर लेखत असतात. ज्यांनी चित्रपटाचा स्क्रीनप्ले आणि डायलॉग्स लिहिले आहेत. तसंही आमच्या जगात असं अनेकदा होतं. हे दिग्दर्शक खूप पॉवरफूल असतात. खरंतर दिग्दर्शक होणं हिच मोठी गोष्ट असते.' तर तिच्या या पोस्टवर इतर नेटकऱ्यांनी देखील कमेंट केली आहे.

हेही वाचा : 'मला घटस्फोट दे, मला जे पाहिजे ते...'; अंकिता लोखंडे आणि विकी जैनचं लग्न धोक्यात

'ॲनिमल' या चित्रपटात भलीमोठी स्टारकास्ट पाहायला मिळाली आहे. या चित्रपटात रणबीरसोबत रश्मिका मंदाना महत्त्वाच्या भूमिकेत आहे. तर हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.