मुंबई : बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खान सध्या मोठ्या अडचणीत सापडला आहे. शाहरुखचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणामुळे आर्थर जेलमध्ये आहे. गेल्या काही दिवसांपासून न्यायालयात आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे. गुरूवारी सुनावणी झाल्यानंतर देखील आर्यनाला जामीन मंजूर झाला नाही. आता 20 ऑक्टोबर रोजी त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवस त्याला तुरूंगात काढावे लागणार आहेत.
दरम्यान, आर्यनच्या अटकेनंतर बॉलिवूड अभिनेते आणि दिग्दर्शक त्याचं समर्थन करत आहे. आर्यनच्या समर्थनार्थ एका दिग्दर्शकाने तर देशात ड्रग्सला मान्यता मिळण्याची मागणी केली आहे. दिग्दर्शक हंसल मेहता यांनी आर्यन खानच्या जामिनावर निर्णय राखून ठेवल्यानंतर, ट्वीट करत ड्रग्सला मान्यता देण्याची मागणी केली आहे.
हंसल मेहता ट्विट करत म्हणाले, 'जगातील अनेक देशांमध्ये चरस/गांजा (Marijuana/Cannabis) लीगल आहे. पण भारतात ड्रग्स पदार्थांचा वापर त्रास देण्यासाठी केला जातो. ज्याप्रकारे कलम 377 च्या विरोधात आंदोलन सुरू करण्यात आले होते, त्याचप्रमाणे हे देखील संपले पाहिजे.'
2 ऑक्टोबरला झाली होती अटक
ड्रग्स प्रकरणात 2 ऑक्टबरला आर्यन खानला अटक करण्यात आली होती. 3 ऑक्टोबरला किला कोर्टाने एक दिवासाचा रिमांड मंजूर केला. 4 ऑक्टोबरला झालेल्या सुनावणीत आर्यनला 7 ऑक्टोबरपर्यंत एनीसीबी कोठडी सुनावण्यात आी. एनसीबी कोठडी संपल्यानंतर आर्यन खानसह इतर आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
गुरूवारीही आर्यन खानला दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे आणखी पाच दिवस आर्यनला तुरुंगातच राहवं लागणार आहे. आर्यन खानबरोबरच अरबाझ मर्चंट आणि मूनमून धमेचा यांच्या जामीन अर्जावरही 20 तारखेलाच सुनावणी होणार आहे.