'मी रिटायरमेंट...' शाहरुखनं IIFA 2024 च्या मंचावर निवृत्तीचा उल्लेख करताच पुढे काय झालं?

Shah Rukh Khan in IIFA 2024 : कलाविश्वाला शाहरुख ठोकणार रामराम? चाहत्यांसाठी हे अनपेक्षित वृत्त ठरु शकतं. पाहा सविस्तर माहिती.   

सायली पाटील | Updated: Sep 30, 2024, 10:27 AM IST
'मी रिटायरमेंट...' शाहरुखनं IIFA 2024 च्या मंचावर निवृत्तीचा उल्लेख करताच पुढे काय झालं?  title=
iifa 2024 Karan Johar Asks Shah Rukh Khan Who Will Be Next King of Romance watch video

Shah Rukh Khan in IIFA 2024 : शाहरुख खान... गेल्या कैक दशकांपासून हिंदी कलाविश्वावर अधिपत्य गाजवणारा हा कलाकार. अभिनय क्षेत्तार शाहरुखनं केलेली कामगिरी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये त्याच्या वाट्याला आलेलं यश पाहून अनेकांना कायमच हेवा वाटतो. जगभरात असंख्य चाहते असणाऱ्या या शाहरुखनं आजवर अनेक भूमिका साकारल्या आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. पण, आता मात्र हाच शाहरुख त्याच्या निवृत्तीवरही भाष्ट करताना दिसला. 

असं का? नुकत्याच पार पडलेल्या (iifa awards 2024) आयफा पुरस्कार सोहळ्याच्या मंचावर शाहरुखचा जलवा पाहायला मिळाला. किंग खाननं बऱ्याच वर्षांनंतर एखाद्या पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन केलं आणि कलाकारांसाठीही त्याला या अंदाजात पाहणं म्हणजे एक परवणी ठरली. इथं शाहरुख चाहते आणि कलाकार मित्रांना अविस्मरणीय क्षणांचे साक्षीदार होण्याची संधी देत असतानाच त्याच्या एका वक्तव्यानं मात्र चाहत्यांना धक्का बसला. किंबहुना किंग खानची निवृत्ती... हा विचारही करण्यास अनेकजण तयार नव्हते हेच एका व्हायरल व्हिडीओतून पाहायला मिळालं. 

आयफा पुरस्कार सोहळ्यादरम्यान शाहरुखसोबत सूत्रसंचालन करणाऱ्य़ा करण जोहर (Karan johar) यानं थेट त्याच्या निवृत्तीच्याच प्रश्नावर उजेड टाकत त्यानं नेमका काय बेत आखला आहे? असाच प्रश्न केला आणि त्याच्या या प्रश्नाचं उत्तर शाहरुखनंही त्याच्याच अंदाजात देत चाहत्यांची दाद मिळवली. 

हेसुद्धा वाचा : बाप झाल्यावर तब्बल 20 दिवसांनी पहिल्यांदा दिसला रणवीर सिंग; पापाराझीसोबत असा व्यक्त केला आनंद

 

व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत असल्यानुसार करणनं शाहरुखला निवृत्तीनंतर त्याच्या अनुषंगानं पुढील 'किंग ऑफ रोमॅन्स' कोण असेल? असा प्रश्न केला. प्रश्नाचं उत्तर देत शाहरुख म्हणाला, 'खरंतर माझ्यासोबतच रोमॅन्सही निवृत्ती घेईल...'. बस्स! मग काय? शाहरुखच्या या एका उत्तरानं प्रेक्षकांमध्ये बसलेल्या राणी मुखर्जीसह मणीरत्नम यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं आणि चाहत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात किंग खानला दाद दिली. सोशल मीडियावर आयफा पुरस्कार सोहळ्यातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतानाच किंग खानचा हा व्हिडीओ भलताच भाव खाऊन जात आहे असं म्हणायला हरकत नाही.