Actress Allegations On Director : मल्याळम अभिनेत्री मीनूनं चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेता बालचंद्र मेननवर गंभीर आरोप केले आहेत. मीनू यांनी सांगितलं की बालचंद्र यांनी त्यांना 2007 मध्ये इतरांसोबत सेक्शुअल अॅक्ट पाहण्यासाठी बळजबरी केली. मीनूनं या आधी आणखी 7 लोकांवर शारीरिक अत्याचार आणि शिवीगाळ केल्याचे आरोप केले होते. या यादीत लोकप्रिय अभिनेता जयसूत्रच्या नावाचाही समावेश आहे. तिची तक्रार लक्षात घेत एफआयआर दाखल करण्यात आली आहे. मीनू यांनी एका मुलाखतीत हेमा कमेटीच्या रिपोर्टचा प्रभाव आणि तिच्या अनुभवांविषयी मोकळेपणानं सांगितले.
मीनू मुनीरनं इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की बालचंद्र मेनननं 2007 मध्ये तिला जबरदस्ती त्यांच्या रूममध्ये बोलावलं आणि ग्रुप सेक्स दाखवलं. तिनं सांगितलं की 'तिथे आणखी काही लोकं बसले होते. तिथे तीन मुली होत्या आणि ते स्वत: याचा आनंद घेत होते. मी त्या रुममधून बाहेर आले. त्यांनी मला सांगितलं की मी तिथेच बसून ते सगळं पाहू.' त्यांच्या आधीच्या तक्रारींविषयी बोलताना तिनं सांगितलं की या सगळ्या चौकशीमुळे मी खूप आनंदी आहे. अशा दर्जाच्या आमदाराला अटक करणे सोपे नाही.
मीनूनं सांगितलं की जेव्हा रिपोर्ट समोर आली तेव्हा तिला असं वाटलं की जेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की त्या तक्रारिंनंतर एफआयआर दाखल करतील. तेव्हा मला वाटलं की मी याविषयी बोलायला हवं. आपल्या प्रवासाविषयी बोलताना मीनूनं सांगितलं की इंडस्ट्रीमध्ये तिचा कशा प्रकारे भ्रमनिरास झाला.याविषयी सांगत मीनू म्हणाली, "माझी अनेक स्वप्ने होती, पण ही इंडस्ट्री माझ्यासाठी एका वाईट स्वप्नासारखी ठरली. या (हेम कमेटीच्या रिपोर्ट) फक्त इंडस्ट्रीला स्वच्छ करत आहे असं नाही तर त्यासोबत समाजाला देखील साफ करत आहे. मीनूनं यावर असलेल्या आरोपांवर देखील उत्तर दिलं आहे.
हेही वाचा : ज्येष्ठ अभिनेते Mithun Chakraborty यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
मीनूवर तिचा चुलत भावानंच POCSO लावला. त्याविषयी सांगत मीनू म्हणाली, तिला माझ्यावर सूड घ्यायचा आहे कारण मी तिला ऑफर मिळवण्यास मदत केली नाही. मला इंडस्ट्री कशी आहे हे माहित असताना मी तिला कशी मदत करू शकते. कारण या सगळ्यात माझ्या विरोधात काही घटक आहेत. ही एक अशी लढाई आहे जी मला स्वतःला लढायची आहे." मीनूनं हे देखील सांगितलं की तिच्याशी चर्चा करत हे संपूर्ण प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला आणि कॉम्प्रोमाइज करण्यासाठी अनेक कॉल केले, ज्यासाठी तिला पैशांची ऑफर देण्यात आली. तिनं सांगितलं की आता मी मी अनोळखी नंबरवरून कॉल उचलत नाही."