...म्हणून टीना आहुजाच्या करिअरला सलमानचा टेकू मिळाला नाही!

गोविंदाची मुलगी टीनादेखील आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी धडपडतेय. 

Updated: May 29, 2018, 11:43 PM IST
...म्हणून टीना आहुजाच्या करिअरला सलमानचा टेकू मिळाला नाही! title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि गोविंदा यांनी अनेक सिनेमांत एकत्र काम केलंय... या दोघांची मैत्रीही अनेकांच्या चर्चेचा विषय ठरली होती. आता मात्र गोविंदा आणि सलमान यांच्या मैत्रीत वितुष्ट आल्याचं दिसतंय.  ९० च्या दशकांत प्रेक्षकांवर गोविंदाची जादू दिसून येत होती... आता मात्र गोविंदा दीर्घकाळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे... तो मोठ्या पडद्यावर दिसला तरी प्रेक्षकांनी त्याला हवा तसा प्रतिसाद दिला नाही. सोबतच, गोविंदाची मुलगी टीनादेखील आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी धडपडतेय. 

टीनाचं बॉलिवूडमध्ये पदार्पण हीच कदाचित सलमान आणि गोविंदा यांच्यातील वितुष्टाची बाब ठरलीय. बॉलिवूडचा दबंग खान सिनेसृष्टीत नवीन टॅलेन्ट लॉन्च करण्यासाठी ओळखला जातो. त्यामुळेच, अनेक जण त्याला आपला गॉडफादरही मानतात... आत्तापर्यंत कतरिना कैफ, डेझी शाह, सुरज पांचोली यांना सलमाननं बॉलिवूडमध्ये पाय रोवण्यासाठी मदत केल्याचं जगजाहीर आहे.

तसं पाहिलं तर 'सेकंड हॅन्ड हस्बंड' या सिनेमातून गोविंदाची मुलगी टीना अहुजा हीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं... पण हा सिनेमा सूपरफ्लॉप ठरला. यानंतर सलमान टीनाला आपल्या एखाद्या सिनेमातून लॉन्च करणार असल्याची चर्चाही रंगली.

याचबद्दल बोलताना एका कार्यक्रमात टीनानं स्पष्टीकरण दिलं... मला लॉन्च करण्यासाठी माझ्या वडिलांनी कधीही सलमानला गळ घातली नाही.

२००७ साली आयफा पुरस्कार कार्यक्रमा दरम्यान सलमानसोबत टीना दिसली होती. त्यानंतर सलमानसोबत ती लवकरच डेब्यू करणार असल्याच्या अफवा उडाल्या होत्या. 'दबंग'मध्येही सलमाननं सोनाक्षी सिन्हाला लॉन्च केलं. त्यामुळेही टीनाच्या अपेक्षा धुळीला मिळाल्या.