Neelam Kothari : 80 आणि 90 च्या दशकात बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये नीलम कोठारी सोनी एक आहे. नीलमनं त्या काळात अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्यात 'इल्जाम', 'खुदगर्ज', 'हत्या', 'ताकतवर', 'हम साथ साथ हैं' आणि 'कुछ कुछ होता' सारखे चित्रपट आहेत. नीलम तिच्या अभिनयानं सगळ्यांची मने जिंकली. मात्र, अचानक नीलमनं चित्रपटसृष्टीपासून लांब होण्याचा निर्णय घेतला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नीलमनं तिचा हा संपूर्ण प्रवास आणि तिच्या या निर्णयाविषयी सांगितलं.
नीलमनं 'एएनआई' या न्यूज एजंसीला दिलेल्या मुलाखतीत याविषयी सांगितलं आहे. तिला असं वाटू लागलं होतं की तिचं चित्रपटसृष्टीतील शेल्फ लाइफ संपलं आहे. तिनं सांगितलं की "माझा प्रवास हा यो-यो सारखा होता... हे तुम्हाला माहित आहे. मी 80 ते 90 च्या दशकात सुरुवात केली. मग, मी इंडस्ट्री सोडली आणि स्वत: चा बिझनेस सुरु केला. कुटुंबाच्या ज्वेलरी बिझनेसला पुढे घेऊन गेले. त्यानंतर मी 'फॅबुलस लाइव्स'सोबत धमाकेदार एन्ट्री केली आणि ते अनपेक्षित होतं. मी खूप भाग्यशाली आहे की मला ही संधी मिळाली. माझा प्रवास हा एका रोलर कोस्टर प्रवासासारखा होता. मी आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले. मी सगळं काही पाहिलं आहे."
नीलमनं चित्रपटसृष्टीत करिअर केल्यानंतर ज्वेलरी बिझनेस सांभाळल्यानंतर पुन्हा एकदा रिअॅलिटी शोमधून एन्ट्री केली. चार वर्षांपूर्वी नीलमनं 'फॅबुलस लाइव्स' मधून कमबॅक केलं. नीलमनं पुढे सांगितलं की "प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मी इंडस्ट्री सोडली कारण मला वाटलं की माझा काळ हा संपत चालला आहे. जेव्हा मी 50 वर्षांची झाली तेव्हा मला या सगळ्यावर कॉन्फिडन्स झाला कारण एक आई असण्याच्या नात्यानं, पत्नी असण्याच्या नात्यानं आणि एक वर्किंग आईच्या नात्यानं मी ऑफिसला जायचे आणि घरी परत यायचे. त्यानंतर अचानक मी कमबॅक केला. तो सुद्धा धमाक्यासोबत... त्यामुळे एक गोष्ट कळते की वय हा फक्त एक आकडा आहे."
हेही वाचा : 'माझ्या मित्र-मैत्रिणींना...', जया बच्चन यांच्या विषयी श्वेता आणि नव्या नवेलीचं एकमत
नीलम सध्या पॉडकास्ट सीरिज 'मार्वल्स वेस्टलॅन्ड्स : वूल्वरिन' मुळे चर्चेत आहे. तिन जीन ग्रेच्या भूमिकेला डब केलं आहे. तर काही महिन्यात ती 'फॅब्युलस लाइव्स ऑफ बॉलिवूड वाइव्स' च्या तिसऱ्या सीझनमध्ये दिसणार आहे.