'मौत मुबारक हो...', Meena Kumari यांच्या निधनानंतर नर्गिस दत्त यांनी का दिल्या अशा विचित्र शुभेच्छा

अभिनेत्री मीना कुमारी (Meena Kumari) या बॉलिवूडमध्ये ट्रॅजेडी क्वीन म्हणून ओळखल्या जात होत्या. मीना कुमारी या त्यांच्या प्रोफेश्नल लाइफपेक्षा त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. मीना या 18 वर्षांच्या असताना 34 वर्षांच्या कमाल अमरोही (Kamal Amrohi) यांच्यासोबत लग्न बंधनात अडकल्या. कमाल अमरोही हे चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक होते. लग्नानंतर मीना या त्यांचे वडील अली बक्श यांच्यासोबत राहत होते. घरातल्या लोकांना जेव्हा मीना यांच्या लग्नाविषयी कळाले तेव्हा सगळीकडे एकच खळबळ सुरु होती, त्यानंतर त्या कमाल अमरोहीसोबत राहू लागल्या. 

Updated: Dec 14, 2022, 07:02 PM IST
'मौत मुबारक हो...', Meena Kumari यांच्या निधनानंतर नर्गिस दत्त यांनी का दिल्या अशा विचित्र शुभेच्छा title=

Nargis Dutt Said Maut Mubarak Ho On Meena Kumari Demise : अभिनेत्री मीना कुमारी (Meena Kumari) या बॉलिवूडमध्ये ट्रॅजेडी क्वीन म्हणून ओळखल्या जात होत्या. मीना कुमारी या त्यांच्या प्रोफेश्नल लाइफपेक्षा त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. मीना या 18 वर्षांच्या असताना 34 वर्षांच्या कमाल अमरोही (Kamal Amrohi) यांच्यासोबत लग्न बंधनात अडकल्या. कमाल अमरोही हे चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक होते. लग्नानंतर मीना या त्यांचे वडील अली बक्श यांच्यासोबत राहत होते. घरातल्या लोकांना जेव्हा मीना यांच्या लग्नाविषयी कळाले तेव्हा सगळीकडे एकच खळबळ सुरु होती, त्यानंतर त्या कमाल अमरोहीसोबत राहू लागल्या. 

मीना कुमारी या कमाल अमरोही यांच्यासोबत राहू लागल्या पण त्यानंतर त्यांच्यावर अनेक बंधने लादण्यात आली. कमाल यांची इच्छा होती की मीना कुमारी यांनी पुन्हा चित्रपटात काम करु नये. मात्र, मीना यांची चित्रपटात काम करण्याची इच्छा पाहता कमाल यांनी त्यांच्यासमोर काही अटी ठेवत अभिनय करण्याची परवानगी दिली.  कोणत्याही परिस्थितीत मीना या संध्याकाळी 6.30 च्या आधी घरी परतायला पाहिजे. त्यांच्या मेकअप रुममध्ये इतर कोणत्याही गैर-पुरुषाला येण्यास परवानगी नाही. 

हेही वाचा : Face Off: 'छैय्या छैय्या' गाण्यावर Malaika Arora ला टक्कर देणार Nora Fatehi, पाहा Video

मीना कुमारी यांना कमाल अमरोही यांच्या या अटी इच्छा नसतानाही मान्य कराव्या लागल्या, पण हळूहळू त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ लागला. हे दु:ख दूर करण्यासाठी मीना कुमारी यांनी दारूचा आधार घेतला. त्या रात्रंदिवस नशेत राहू लागली. रिपोर्ट्सनुसार, कमाल अमरोही मीना कुमारीसोबत प्रचंड भांडायचे. यामुळे मीना कुमारी दुखावल्या होत्या आणि अखेर त्यांनी वयाच्या ३८ व्या वर्षी लिव्हर सिरोसिसमुळे जगाचा निरोप घेतला.

नर्गिस दत्त का म्हणाल्या 'मौत मुबारक हो?'

नर्गिस दत्त (Nargis Dutt) या मीना कुमारी यांच्या जवळची मैत्रिण होत्या आणि मीना यांना होणाऱ्या त्रासाविषयी त्यांना सगळं ठावूक होते. मीना कुमारी यांच्या निधनानंतर नर्गिस दत्त यांनी त्यांचा निरोप घेताना 'मौत मुबारक हो' असे म्हटले. खरंतर नर्गिस यांनी बऱ्याचवेळा कमाल अमरोही यांना मीना यांच्यावर मारहाण करताना पाहिले. नर्गिस यांना मीना यांच्या वेदना दिसत होत्या. नर्गिस यांच्या म्हणण्यानुसार, मीना कुमारी यांच्यासाठी हे जग योग्य नव्हते.