Cannes Film Festival मधील एकमेव भारतीय ज्यूरी मिनाक्षी शेडे आहेत तरी कोण?

Who is Meenakshi Shedde at Cannes: सध्या कान्स चित्रपट महोत्सवाला सुरूवात झाली आहे. यावेळी भारतीय सेलिब्रेटींनीही (Cannes Film Festival 2023) आपला जलवा दाखवला आहे. कान्स चित्रपट यावेळी ज्यूरी म्हणून काम पाहणाऱ्या एकमेव भारतीय मिनाक्षी शेडे कोण आहेत? त्यांच्याबद्दल जाणून घेऊया या लेखातून. 

गायत्री हसबनीस | Updated: May 18, 2023, 03:17 PM IST
Cannes Film Festival मधील एकमेव भारतीय ज्यूरी मिनाक्षी शेडे आहेत तरी कोण?  title=
(Photo - Meenakshi Shedde | Instagram)

Who is Meenakshi Shedde: कान्स चित्रपट महोत्सवाला दोन दिवसांपुर्वी सुरूवात झाली आहे. यावेळी भारतीय सेलिब्रेटींनीही कान्स चित्रपट महोत्सवाला (Indian Celebrity at Cannes 2023) हजेरी लावली आहे. सारा अली खान, ईशा गुप्ता, मृणाल ठाकूर यांनी यावेळी कान्स चित्रपट महोत्सवात (Sara Ali Khan at Cannes) हजेरी लावली होती. त्याचबरोबर ऐश्वर्या राय बच्चनही काल कान्स महोत्सवासाठी आपली लेक आराध्यासह रवाना झाली आहे. यावेळी कान्स चित्रपट महोत्सवात मिनाक्षी शेडे या ज्यूरी म्हणून उपस्थित होत्या. संपुर्ण पॅनलमध्ये फक्त त्याच एकमेव भारतीय ज्यूरी (Indian Jury Name at Cannes) होत्या. यावेळी त्यांनी कान्समध्ये निवडण्यात आलेल्या चित्रपटांच्या ज्यूरी पॅनलला त्या होत्या. (who is meenakshi shedde the only indian jury at cannes 76th film festival 2023)

मागील वर्षी लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पादूकोण ही ज्यूरीची सदस्य होती. यावेळी मिनाक्षी शेडे या एकमेव भारतीय ज्यूरी पॅनलमध्ये होत्या. आगळ्यावेगळ्या स्टाईलची साडी नेसत त्यांनी रेड कार्पेटवर एन्ट्री केली होती. यावेळी त्यांच्यावेळी  ज्युरींमध्ये अन सरटेन रिगार्ड (वेगळ्या शैलीच्या चित्रपटांसाठी), कॅमेरा डी'ओर (नवोदित चित्रपट निर्मात्यांसाठी) आणि सिनेफोंडेशन (लघुपटांसाठी) या ज्यूरींचाही समावेश आहे. यावेळी मुख्य ज्युरी हे स्वीडिश दिग्दर्शक रूबेन ऑस्टलंड करणार आहेत ज्यात ब्री लार्सन आणि पॉल डॅनो यांचाही समावेश आहे. 

कोण आहे मिनाक्षी शेडे? 

मिनाक्षी शेडे या मुंबईस्थित माजी पत्रकार आहेत. सोबतच त्या चित्रपट समीक्षक आणि क्यूरेटरही (Who is Meenakshi Shedde) आहे. यापुर्वीही त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ज्यूरी म्हणून काम पाहिले आहे. यात कान्स, बर्लिन चित्रपट महोत्सव, व्हेनिस चित्रपट महोत्सव यांचा समावेश आहे. चार दशकांहून अधिक काळ त्या मनोरंजन क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांनी याआधीही अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ज्यूरी म्हणून काम पाहिले आहे. 25 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून त्यांनी ज्यूरी म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी अनेक चित्रपटमहोत्सवांसाठी सल्लागार म्हणूनही काम पाहिले आहे. पत्रकारितेसोबत त्यांनी अनेक चित्रपट लिहिले आहेत. त्याचसोबत त्यांनी दिग्दर्शन आणि निर्मितीही केली आहे. 

हेही वाचा - Reema Lagoo Death Anniversary: 'बॉलिवूडच्या मां'चे 'हे' सुपरहिट चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यापुर्वीही गाजवलंय भारतीयांनी ज्यूरी पॅनल

यापुर्वी कान्स चित्रपट महोत्सवात मीरा नायर, अरूंधती रॉय, ऐश्वर्या रॉय बच्चन, नंदिता दास, शर्मिला टागोर, शेखर कपूर, विद्या बालन, दीपिका पादूकोण या भारतीय सेलिब्रेटींनीही ज्यूरी म्हणून काम पाहिले होते. कान्स चित्रपट महोत्सवात सगळ्याअधिक चर्चा होते ती म्हणजे कान्स महोत्सवात आलेल्या (Indian Celebrity as Jury at Cannes) सेलिब्रेटींच्या रेड कार्पेट लुकची. यावेळी त्यांच्या लुकवर सगळ्यांच्याच नजरा खिळलेल्या असतात. सोबतच त्यांच्या महागड्या कपड्यांच्या किमतींचीही चर्चा होते. उद्यापर्यंत कान्स चित्रपट महोत्सव सुरू राहणार आहे.