मुंबई : स्मॉल स्क्रिनवरील 'मन उडू उडू झालं' या मालिकेने फार कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान बनवायला सुरुवात केली आहे. या मालिकेत फुलपाखरु फेम अभिनेत्री हृता दुर्गुळे महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. तर तिच्या सोबत दाखवण्यात आलेली इंद्रा बाबत जाणून घेण्यात देखील प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
इंद्राचं खरं नाव अजिंक्य राऊत असं आहे. ही त्यांची पहिलीच मालिका नाही. याआधी ही त्याने अनेक प्रोजेक्टमध्ये काम केलं आहे. अजिंक्यने कॉलेजचं शिक्षण पुण्यातील डी.वाय. पाटीलमध्ये केलं आहे. तर शालेय शिक्षण हे परभणीत पुर्ण झालं आहे. कोठारे व्हिजन निर्मित विठू माऊली या मालिकेतून त्याने स्मॉल स्क्रिनवर पदार्पण केलं आहे.
तर प्रथमेश परबसोबत तो टकाटक - 2 मध्ये ही झळकला आहे.
तो म्हणतो की, त्याला अॅक्टर म्हणून स्वत:ला एक्सप्रोर करायला फार आवडते. आता मी इंद्राची भूमिका साकारतो आहे. आधी मी विठू माऊली मध्ये विठ्ठलाची भूमिका साकराली . 23-24 वर्षांच्या तरुणाला देवाच्या भूमिकेत स्वीकारायला लावणं हे आव्हान होतं.
अजिक्यचं लहानपण परभणीत गेलं. तो मूळचा परभणीचा आहे. 17 वर्ष तो तिथे राहिला आहे. विठ्ठलाची भूमिका साकरताना मला माझ्या बोली भाषेपासून, बोलण्याच्या टोनपर्यंत सर्न गोष्टींमध्ये बदल करावा लागला, असं अजिंक्यने म्हटलं आहे.
मराठमोळा साज आणि साऊथ इंडियन फ्लेवर मिळून 'मन उडू उडू झालं' ही मालिका तयार करण्यात आली आहे.