मुंबई : सोनाक्षी सिन्हा सध्या बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात सुपरस्टार सलमान खानच्या दबंग या चित्रपटातून केली होती. 'दबंग' चित्रपटानंतर तिच्या पदरात अनेक उत्तमोत्तम चित्रपट पडले. आज सोनाक्षी सिन्हा संपूर्ण चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव बनली आहे. तिने आयुष्यात खूप काही मिळवलं आहे.
त्यामागे तिची मेहनत आहे. सोनाक्षी सिन्हाने तिच्या फिल्मी करिअरमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत आणि लोक तिच्या अभिनयाचं खूप कौतुकही करतात. त्यामागे तिची मेहनत आहे. सोनाक्षी सिन्हाने तिच्या फिल्मी करिअरमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत आणि लोकं तिच्या अभिनयाचं खूप कौतुकही करतात.
तिच्या उत्कृष्ट अभिनयामुळेच ती चित्रपटसृष्टीत ओळखली जाते. दरम्यान, सोनाक्षी सिन्हा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी सोनाक्षी सिन्हा तिच्या कोणत्याही चित्रपटामुळे चर्चेत नसून, तिने तिच्यासोबत झालेल्या चुकीच्या वागणुकीची व्यथा मांडली आहे. ज्यामुळे सध्या सर्वत्र तिची चर्चा होत आहे.
वाईटरित्या स्पर्श केला
2010 मध्ये दबंग चित्रपटाच्या एका कार्यक्रमादरम्यान सोनाक्षी सिन्हाला पाहण्यासाठी गर्दी इतकी वाढली होती की, काही लोकांनी अभिनेत्रीला जबरदस्ती स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता. दक्षिण मुंबईतील मंत्रालयाजवळील गांधी मैदानात ही घटना घडली. या घटनेने अभिनेत्री इतकी हादरली की ती तिथेच रडू लागली.
सोनाक्षी सिन्हा एका सेलिब्रिटी कुटुंबातून आली आहे. इंडस्ट्रीत तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांचं मोठ्या अभिनेत्यांमध्ये घेतलं जातं. त्यामुळे सोनावर नेहमीच दबाव राहिला आहे. अभिनेत्रीच्या अभिनयाचं लोकांनी कौतुक केलं आहे. जरी तिची चित्रपट कारकीर्द तिच्या वडिलांप्रमाणे यशस्वी झाली नाही. मात्र अभिनेत्री तिच्या प्रयत्नात व्यस्त आहे.