जेव्हा रेखा आणि बिग बींसोबत लाँग ड्राईव्हला जायच्या जया बच्चन... पहिल्यांदाच समोर आला अनोखा किस्सा

Rekha Amitabh Bachchan : रेखा सुरुवातीच्या काळात जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्याच बिल्डींगमध्ये राहायच्या. तेव्हा या तिघांमध्ये खूप चांगली मैत्री होती. एवढंच नव्हे तर तिघे अनेकदा लाँग डॅाईव्हला देखील जायचे. तेव्हा....

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: May 21, 2024, 08:22 AM IST
जेव्हा रेखा आणि बिग बींसोबत लाँग ड्राईव्हला जायच्या जया बच्चन... पहिल्यांदाच समोर आला अनोखा किस्सा title=

अमिताभ बच्चन आणि रेखा 'गुड्डी' सिनेमाच्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर त्यांनी 'जंजीर' या सिनेमातून ही जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आली त्यानंतर जून 1973 रोजी या दोघांनी लग्नगाठ बांधली. या दोघांच्या लग्नापासून ते अगदी आतापर्यंत ही जोडी कायमच चर्चेत असते. याला कारणं मात्र अनेक आहे. अशी देखील चर्चा आहे की, अमिताभ बच्चन यांच अभिनेत्री रेखा यांच्यासोबत अफेअर होतं. ही चर्चा तेव्हापासून अगदी आतापर्यंत सुरुच आहे. पण तुम्हाला हे माहित आहे का? जया बच्चन आणि  रेखा एकेकाळी एकमेकांच्या खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. एवढंच नव्हे तर रेखा यांनी सांगितलं देखील होतं की, या चर्चांमुळे रेखा आणि जया बच्चन यांच्या मैत्रीमध्ये कधीच दुरावा आला नाही. 

रेखा या जया बच्चन यांच्यात इमारतीमध्ये राहायच्या. या दोघींनी एकमेकिंच्या करिअरबद्दलच्या अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. जया यांनी अमिताभ बच्चन यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा या तिघांमध्ये खूपच चांगली मैत्री झाली. यानंतर हे तिघे एकत्र ड्राईव्हला जात असतं. याबाबतचा खुलासा हनीफ झवेरी यांनी मेहबुब यांच्या बायोग्राफीमध्ये लिहिली आहे. 

अमिताभ बच्चन आणि अनवर (मेहबुब यांचे भाऊ) हे एकमेकांचे चांगले मित्र होते. अनवर यांनी सांगितलं की, अमिताभ आणि जया अनेकदा लाँग ड्राई्व्हला जात. यावेळी त्यांच्यासोबत मागच्या सीटवर रेखा असायची. हे तिघंही संपूर्ण प्रवासात गप्पा मारायचे. 

खूप वर्षांनी रेखा यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलं. त्यानंतर या दोघांच्या नावाची चर्चा सुरु झाली. पण रेखा यांनी सिमी अग्रवाल यांच्या मुलाखतीत सांगितले होते की, या चर्चा रेखा आणि जया यांच्या नात्यावर काहीच परिणाम करु शकल्या नाहीत. जया बच्चन या कायमच रेखा यांच्यासाठी 'दिदीबाई' राहिल्या आहेत. दिदीभाई म्हणजे जया या खूप समजूतदार होत्या. या दोघी कायमच एकत्र राहिल्या आहेत. त्यांच्याकडे खूप प्रतिष्ठा आहे. आम्ही एकाच बिल्डिंगमध्ये राहतो. त्यामुळे यांचं नातं अतिशय घट्ट आहे. ती आजही माझी दिदीभाई आहे. लोकं काय चर्चा करतात त्या चर्चेचा परिणाम आमच्या नात्यावर अद्याप झालेला नाही.