Amitabh Bachchan यांच्या उपस्थितीत नात मासिक पाळीबद्दल बोलते तेव्हा...

'Periods दुर्लक्षित विषय आहे, पण...', Amitabh Bachchan यांच्या उपस्थितीत नात नव्याने मासिक पाळीबद्दल व्यक्त केलं मत  

Updated: Oct 6, 2022, 03:39 PM IST
Amitabh Bachchan यांच्या उपस्थितीत नात मासिक पाळीबद्दल बोलते तेव्हा...  title=

Navya Naveli Nanda Talks About Periods: महानायक अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांची नात नव्या नवेली नंदा (navya naveli ) तिच्या पॉडकास्टमुळे (podcast) चर्चेत आहे. नुकताच नव्या एका कार्यक्रमात पोहोचली होती, ज्याठिकाणी तिने सांगितलं, ती स्वतः कशी  पुरोगामी विचारांची आहे आणि आजूबाजूच्या लोकांनी देखील तिच्या विचारांचा स्वीकार केला आहे. महत्त्वाचं म्हणजे एका ओपन प्लॅटफॉर्मवर नव्याने आजोबा आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत मासिक पाळीबद्दल स्वतःचं मत व्यक्त केलं आहे. (navya naveli on periods) 

नव्या नवेली नंदा, आणि अभिनेते अमिताभ बच्चन, दिया मिर्झा आणि रश्मिका मंदान्ना यांनी अलीकडेच आरोग्याविषयी एका टेलिथॉनमध्ये भाग घेतला, जिथे तज्ज्ञांनी महिलांचे आरोग्य आणि ते कसे सुधारता येईल यावर देखील चर्चा केली.

यावेळी नव्याने सांगितले की, ती अशा कुटुंबात वाढली आहे जिथे तिला दुर्लक्षित असलेल्या गोष्टींवर स्पष्ट बोलणं व्हायचं. त्यापैकी एक म्हणजे महिलांना येणारी मासिक पाळी. महिलांचं आरोग्य या महत्त्वाच्या विषयावर रश्मिका म्हणाली, 'तरुण आई-वडिलांसोबत या दुर्लक्षित विषयांवर बोलत नाहीत...'

रश्मिताने व्यक्त केलेल्या बिग बींना सहमती दर्शवली. ते म्हणाले, 'मासिक पाळी म्हणजे जीवनातील एक संकेत आहे...'  (a sign of recreation) बिग बींच्या वक्तव्यानंतर नव्याने मासिक पाळीवर उघडपणे स्वतःचं मत व्यक्त केलं.

नव्या म्हणाली, 'जसं बच्चन यांनी सांगितलं मासिक पाळी ( menstruation ) म्हणजे जीवनातील एक संकेत आहे. यामध्ये महिलांना  लाज  वाटण्यासारखी कोणतीही गोष्ट नाही. गेल्या अनेक वर्षांपासून मासिक पाळी दुर्लक्षित विषय आहे. पण आता प्रगती होत आहे. मी आज याठिकाणी उभी आहे आणि आजोबांसमोर मासिक पाळीबद्दल बोलत आहे... ही देखील एक प्रगती आहे.'

नव्या पुढे म्हणाली, 'आज आपण एका व्यासपीठावर बसलो आहोत ज्यामध्ये बरेच लोक आपल्याला पाहत आहेत आणि मासिक पाळीबद्दलचं संभाषण हे दर्शवते की आपण केवळ महिला म्हणून नव्हे तर एक देश म्हणूनही प्रगती केली आहे.'

यामध्ये लाज वाटण्यासारखं काही नाही...
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, बदलाची सुरुवात नेहमी घरातून होते. महिलांना मासिक पाळीबद्दल बोलताना स्वतःबद्दल सुरक्षित वाटलं पाहिजे. बाहेर सोसायटीत जाऊन त्याबद्दल बोलण्याआधी आपल्या घरातून याची सुरुवात करायला हवी. मी भाग्यवान होतो की मी अशा घरात वाढली जिथे मला याबद्दल संभाषण करण्यास सोयीस्कर वाटलं."

नव्याने 2020 मध्ये 'आरा हेल्थ' म्हणून महिलांसाठी ऑनलाइन हेल्थकेअर पोर्टलची सह-स्थापना केली आहे. नव्याने 'नवेली' ही मोहीमही सुरू केली, ज्याद्वारे लिंग असमानतेशी लढा देण्याचं तिचं उद्दिष्ट आहे.