Raj Kapoor and Mandakini: राज कपूर यांच्या चित्रपटांचे आपण सर्वचजण फॅन (Raj Kapoor) आहोत. त्यांच्या अभिनयाचे चाहते असलेले त्यांचे अवलिया फॅन्स आजही त्यांच्या चित्रपटांबद्दलच काय तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, त्यांच्या संघर्षावर बोलतना दिसतील. त्यांच्या पिढीच्या आठवणी आजही अनेकांच्या मनात घर करून आहेत. त्यांचे आयुष्य हे अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले होते. आजही त्यांचे चित्रपट हे अजरामर आहेत. त्यांची आणि नरगिस यांची जोडी (Raj Kapoor and Nargis) ही कायमच प्रेक्षकांच्या स्मरणात राहणार आहे. राज कपूरचं नावं घेतलं की आपल्या डोळ्यासमोर त्यांची अख्खी पिढी उभी राहते. त्यांच्या पिढीतील (Raj Kapoor Movies) जवळपास सर्वच सिनेमासृष्टीत सक्रिय आहेत. (what is the story of mandakini and raj kapoor when they first met in a private cottage entertainment news in marathi)
परंतु वर म्हटल्याप्रमाणे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलचे किस्से अनेकदा चर्चिले जातात. त्यातील एक किस्सा (Raj Kapoor Personal Life) सध्या व्हायरल होतो आहे आणि तो म्हणजे अभिनेत्री मंदाकिनी आणि राज कपूर यांच्या पहिल्या भेटीचा. 'राम तेरी गंगा मैली' (Ram Teri Gana Maili) या चित्रपटाच्या निमित्ताने राज कपूर यांनी अभिनेत्री मंदाकिनी (Raj Kapoor and Mandakini) यांना संधी दिली होती. त्या चित्रपटामध्ये मंदाकिनी समवेत अभिनेते राजीव कपूरही (Rajiv Kapoor) होते. राजीव कपूर हे राज कपूर यांचे धाकटे चिरंजीव होते. या चित्रपटातून राजीव यांना जेवढी प्रसिद्धी मिळाली त्याहूनही जास्त प्रसिद्धी ही त्यांच्यासोबत काम केलेल्या मंदाकिनी यांना मिळाली होती. मंदाकिनी यांचे सौंदर्य 80 च्या दशकात प्रेक्षकांच्या नजरेत भरले होते.
1985 साली या चित्रपटानं मंदाकिनी (Manadakini Bold Scenes) यांना एक वेगळी ओळख दिली होती. त्यामुळे मंदाकिनी यांचा फॅन बेस तेव्हापासून तयार झाला होता. त्यानंतर 80 आणि 90 चं दशक हे पुर्णत: मंदाकिनी यांचेच होते. त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळू लागली. परंतु आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, तो म्हणजे राज कपूर आणि मंदाकिनी यांच्या पहिल्या भेटीचा. ही भेट एक प्रायव्हेट कॉटेजमध्ये झाली होती. त्यावेळी राज कपूर यांनी मंदाकिनी यांना काही प्रश्न विचारले होते.
मंदाकिनी यांनी आपल्या मुलाखतीत असं म्हटलं आहे की, त्यांची आणि राज कपूर यांची भेट ही राज कपूर यांच्या स्टुडिओच्या जवळ एका प्रायव्हेट कॉटेजमध्ये झाली होती. त्यावेळी राज कपूर यांनी विचारले की, तुम्हाला कोणी सख्खे भाऊ - बहिण आहेत का त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या की, हो आम्ही गावाकडून आलो आहोत त्यामुळे आमच्या इथे हे खूप कॉमन आहे.
हेही वाचा - Saving Formula 50/30/20 Rule: शंभर रुपयांची नोट आहे? आता तुम्ही करोडपती झालाच म्हणून समजा
मंदाकिनी या जेव्हा राज कपूर यांना भेटायला आल्या होत्या तेव्हा त्या ट्रेडिशनल ड्रेस मध्ये आल्या होत्या. त्यांनी सलवार कमीज घातले होते. त्यावर राज कपूर म्हणाले होते की, बरं झालं की तुम्ही पारंपारिक कपडे घालून आलात जर का तुम्ही जीन्ससारखे मॉड कपडे घातले असतेत तर मला ते अजिबातच आवडलं नसतं.