वहिनीसाहेबांच्या बाळाचं बारसं, काय ठेवलं नाव?

सगळ्यांची लाडकी राणादाची वहिनी आणि मराठमोळी अभिनेत्री धनश्री काडगावकर सध्या आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.

Updated: Jun 27, 2021, 08:23 PM IST
वहिनीसाहेबांच्या बाळाचं बारसं, काय ठेवलं नाव? title=

मुंबई : सगळ्यांची लाडकी राणादाची वहिनी आणि मराठमोळी अभिनेत्री धनश्री काडगावकर सध्या आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. धनश्रीने काही दिवसांपूर्वीच एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. लॉकडाऊनच्या काळात गरोदर राहिलेल्या धनश्रीने आपल्या गरोदरपणाचा काळ खूप एन्जॉय केला. धनश्रीने नुकतेच सोशल मिडियावर नामकरणाचे फोटो शेअर केले आहेत. 

अनेकदा बाळाचे अगदी लहानपणीचे फोटो शेअर करायचे नसतात. तसेच याआधी अनेक फोटो धनश्रीने इंस्टाग्रामवर शेअर केले होते.ज्यामध्ये बाळाचा चेहरा दिसत नाहीये. मात्र पहिल्यांदा धनश्रीने सोशल मिडियावर बाळाचे फोटो शेअर करत बाळाचं नाव जाहिर केलं आहे. धनश्री कडगावरच्या बाळाचं नाव 'कबीर' असं ठेवण्यात आलं आहे

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dhanashri Kadgaonkar (@kadgaonkar_dhanashri)

धनश्रीच्या घरी २९ जानेवारीला छोट्या चिमुकल्याचं आगमन झालं. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. धनश्रीने दिलेल्या माहितीनंतर तिच्या चाहत्यांनी तिला अनेक शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर अनेक सेलिब्रेटींनीही धनश्री आणि तिच्या बाळाला शुभेच्छा आणि आशिर्वाद देत आहेत.

धनश्री सोशल मीडियावर खूप ऍक्टिव असते. तिने गरोदरपणात आपल्या प्रत्येक गोष्टी शेअर केला होत्या. त्याच प्रमाणे गरोदर असल्याची गोड बातमी देखील तिने एका व्हिडिओतून शेअर केली होता. कुणी तरी येणारं गं म्हणत हा व्हिडिओ तिने आपल्या नवऱ्याच्या वाढदिवसादिवशी शेअर केला होता. 

'माझिया प्रियाला प्रित कळेना' या मराठी मालिकेतून धनश्रीने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर 'गंध फुलांचा गेला सांगून', 'जन्मगाठ' या मालिकेतूनही धनश्री प्रेक्षकांसमोर आली होती. मात्र, 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून धनश्री घराघरात पोहचली. तिची 'वहिनीसाहेब' ही भूमिका चांगलीच गाजली. मालिका विश्वात सक्रिय असतानाच 2013मध्ये धनश्रीने दुर्वेशसोबत लग्नगाठ बांधली.