'Y' प्रकरण नक्की आहे तरी काय ? जाणून घ्या...

सोशल मिडीयावर सध्या मराठी सिने कलाकारांची जोरदार चर्चा सुरुये. 

Updated: May 14, 2022, 07:36 PM IST
 'Y' प्रकरण नक्की आहे तरी काय ? जाणून घ्या... title=

मुंबई : सोशल मिडीयावर सध्या मराठी सिने कलाकारांची जोरदार चर्चा सुरुये.  मुक्ता बर्वे हिने आपल्या सोशल मीडियावर 'वाय' सिनेमाचं पोस्टर धरलेला एक फोटो शेअर केला. त्यापाठोपाठ मराठी सिनेसृष्टीतील स्वप्निल जोशी, नीना कुळकर्णी, प्राजक्ता माळी इत्यादी अनेक कलाकारांनीही 'वाय' सिनेमाचं पोस्टर हातात धरून त्यांच्या सोशल मीडियावर याचा फोटो शेअर केला आहे! 

या सर्वच कलाकारांनी  " माझा पाठिंबा आहे !  आपला ... ? " अशी विचारणा चाहत्यांना केल्यामुळे , चाहत्यांमध्येही 'वाय' या नावाबद्दल आणि चित्रपटाबद्दल उत्कंठा निर्माण झाली आहे. लवकरच एक नवाकोरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  हे सर्व कलाकार ' वाय ' या चित्रपटांमध्ये आहेत का की यातील काही मोजकेच कलाकार ' वाय ' या चित्रपटामध्ये आहेत की आणखी यापेक्षा वेगळेच कलाकार चित्रपटामध्ये आहेत हे अजूनही गुलदस्त्यात आहे. 

या पोस्टरमागचा अर्थ आणि नेमका उद्देश काय, याविषयीही अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यामुळे आता 'वाय' विषयीची प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.  हा एक प्रमोशनल फंडा असल्याचं समजतयं.  अजित सूर्यकांत वाडीकर दिग्दर्शित 'वाय' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सोशल मिडीयावर सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.

कंट्रोल एन प्रॉडक्शन निर्मित वास्तवाचा थरार दाखवणारा आणि कल्पनेच्या पलीकडील 'ती' च्या लढ्याची गोष्ठ सांगणारा 'वाय' २४ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.