बोल्डनेसमुळे नेहमीच चर्चेत राहणारी Urfi Javed साडी घालून चालली तरी कुठे ?

बॉलिवूडमध्ये  विचित्र स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेली उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असते. 

Updated: May 14, 2022, 07:31 PM IST
 बोल्डनेसमुळे नेहमीच चर्चेत राहणारी Urfi Javed साडी घालून चालली तरी कुठे ?  title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये  विचित्र स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेली उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असते. दररोज तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. 
असाच एक व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ती कान्स फेस्टिव्हलला (Cannes Festival)जात असल्याचे बोलले जात आहे. या व्हिडिओत तीने साडी परिधान केलीय. त्यामुळे उर्फी जावेद साडीवर कान्स फेस्टिव्हलला चाललीय का अशी चर्चा सुरु झाली आहे.  

व्हायरल झालेला व्हिडिओत उर्फीने फ्लोरल प्रिंटेड साडीसह अतिशय आकर्षक ब्लाउज घातलाय. उर्फी या साडीत खूपच बोल्ड दिसतेय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिच्या बोल्डनेसवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर काही नेटकरी साडीवरून तिला ट्रोल करतायत.  
  
या व्हिडिओमध्ये 'तू कान्स फेस्टिव्हलला जात आहेस का?' असा प्रश्न उर्फीला विचारण्यात आला.  यावर ती म्हणते की, तिला इथे फेस्टिव्हलला कोणी बोलावत नाही, तिथे ती काय बोलावणार. तिचे हे उत्तर एकून अनेकांनी तिला कान्स फेस्टिव्हलमध्ये आमंत्रण देण्याचे आवाहन केले आहे.

तसेच अनेक नेटकरी उर्फीला तिच्या वागण्यात सुधारणा करण्याचे आवाहन करत आहेत. जेणेकरून तिला मोठ्या कार्यक्रमांमध्येही सहभागी होता येईल.

उर्फीचा (Urfi Javed) आणखीन एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती साडी सांभाळत पोज देताना दिसत आहे. या तिच्या व्हिडिओवर तिला अनेकजण सावधगिरीने चालण्यास सांगितले आहेत. तर उर्फी ती कधीही पडू शकत नाहीस असे उत्तर देते.