हेरा फेरी-3मध्ये दिसणार अक्षय-सुनील-परेश?

काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारनं सुनील शेट्टीबरोबरचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला होता.

Updated: Apr 18, 2018, 06:09 AM IST
हेरा फेरी-3मध्ये दिसणार अक्षय-सुनील-परेश? title=

मुंबई : काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारनं सुनील शेट्टीबरोबरचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला होता. या फोटोनंतर हेरा फेरीचा पुढचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. या चर्चा आता खऱ्या होण्याची शक्यता आहे. अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी हे हेरा फेरी-3मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येउ शकतील, अशी बातमी डीएनएनं दिली आहे.

२००० साली आलेला पहिला हेरा फेरी प्रियदर्शन यांनी दिग्दर्शित केला होता. पण निर्माते फिरोज नाडियाडवाला आणि प्रियदर्शन यांच्यामध्ये वाद निर्माण झाले होते. पण हे वाद आता मिटले आहेत. त्यामुळे प्रियदर्शनच या चित्रपटाचं दिग्दर्शन करतील. तसंच फिरोज आणि अनिस बासमीमधला वादही मिटला आहे. वेलकम बॅकच्या प्रदर्शनावेळी या दोघांमध्ये वाद झाले होते. त्यामुळे अनिस बासमीही हेरा फेरीचं दिग्दर्शनाच्या रेसमध्ये आहे.

काही दिवसांपूर्वी निधन झालेले दिग्दर्शक आणि लेखक नीरज वोरा यांनी २०१५मध्ये हेरा फेरीसाठी स्क्रिप्ट लिहीलं होतं. हेच स्क्रिप्ट वापरायचं का दुसरं लिहायचं याबाबात अजूनही निर्णय झालेला नाही.

हेरा फेरी-3साठी आम्ही आता अभिनेते निश्चित करत आहोत. दोन आठवड्यानंतर मी याची अधिकृत घोषणा करीन, अशी प्रतिक्रिया फिरोज नाडियाडवाला यांनी दिली आहे.