Video : तरुणांनाही लाजवेल असा फिटनेस, 90 व्या वर्षी वैजयंतीमाला यांचे भरतनाट्यम

Vyjayanthimala Bharatnatyam Dance Video: सध्याच्या अभिनेत्रींचा फिटनेस पाहून आपण त्यांचे सतत कौतुक करत असतो. परंतु यावेळी तुम्ही जे वैजंयतीमाला यांनी केलेले भरतनाट्यम पाहिले असेल तर त्यांचा वयाच्या 90 व्या वर्षी असलेला फिटनेस पाहून आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही. 

गायत्री हसबनीस | Updated: Aug 29, 2023, 08:48 PM IST
Video : तरुणांनाही लाजवेल असा फिटनेस, 90 व्या वर्षी वैजयंतीमाला यांचे भरतनाट्यम title=
vyjayanthimala bharatnatyam dance video at the age of 90 goes viral

Vyjayanthimala Bharatnatyam Dance Video: आजच्या काळात चर्चा असते ती म्हणजे आयटम सॉन्ग आणि फिट अभिनेत्रींची. पण सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे जो पाहून तुम्ही म्हणाल की यै सब तो कुछ भी नहीं... ज्येष्ठ अभिनेत्री वैजंयतीमाला यांच्या नृत्याचे आपण सर्वच जणं फॅन्स आहोत. अर्थात आता वयोमानाप्रमाणे त्या पुर्वासारख्या आपल्याला नृत्य करताना रूपेरी पडद्यावर दिसत नाहीत. परंतु तरीही त्यांचे नृत्य हे आजही पाहावे अशी प्रत्येक चाहत्यांची इच्छा असते. सध्या चर्चा आहे ती म्हणजे त्यांच्या भरतनाट्यम नृत्याची. यावेळी त्यांनी केलेला डान्स पाहून त्यांचे चाहते हे त्यांच्यावर फिदा झाले आहेत. यावेळी त्यांची वयाच्या 90 व्या वर्षी ही एनर्जी पाहून सगळेच भारावून गेले आहेत. आजच्या तरूणाईलाही लाजवेल असा त्यांचा हा डान्स परफॉर्मन्स आहे. तेव्हा तुम्ही जर का हा व्हिडीओ अजूनही पाहिला नसेल तर तो तुम्हाला पाहणं हे अत्यंत गरजेचे आहे. तेव्हा चला तर मग पाहुया. 

अभिनेत्री वैजंयतीमाला यांची सध्या सर्वत्र चर्चा आहे. त्यांच्या अभिनयासाठी आणि नृत्यासाठी त्या आजही ओळखल्या जातात. 13 ऑगस्ट रोजी त्यांनी आपला 90 वा वाढदिवस साजरा केला. सध्या त्यांचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ @bollyblindsNGossips या युझरनं Reddit वर शेअर केला आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी त्यांनी आपली पारंपारिक वेशभुषा ही परिधान केली आहे. यावेळी त्यांनी सुंदर अशी हिरव्या रंगाची साडी परिधान केली आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. नेटकरीही त्यांच्या या व्हिडीओवरती नाना तऱ्हेच्या कमेंट्स करताना दिसत आहेत. 

हेही वाचा : नवी मालिका, नवी भुमिका; तरी अपुर्वाला येते शेवंताची आठवण?

यावेळी नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर या व्हिडीओखाली नानाविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी त्यांच्या नृत्याचे नेटकऱ्यांनी भरपूर कौतुक केले आहे. 60-70 च्या दशकात वैजयंतीमाला यांच्या नृत्याची चांगलीच चर्चा रंगलेली होती. त्यांच्या अभिनयाचेही सर्वचजण फॅन्स होते. 

Legendary Bollywood actress Vyajanthimala dancing on her 90th birth anniversary 
by u/LangdaTotapuri in BollyBlindsNGossip

देवदास, मधुमती, नया दौर, साधना, गूंगा जमना, संगम, लीडर, आम्रपाली अशा अनेक चित्रपटांतून त्यांनी भुमिका केल्या आहेत. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा होती. त्यांचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भारावून गेल्याशिवाय राहणार नाही.