पंतप्रधान मोदींच्या बायोपिकचं पहिलं पोस्टर या दिवशी होणार रिलीज

काय आहे सिनेमाचं नाव

पंतप्रधान मोदींच्या बायोपिकचं पहिलं पोस्टर या दिवशी होणार रिलीज  title=

मुंबई : एका बाजूला माजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील बायोपिक 'द ऍक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर' वरून वाद सुरू असताना आता लवकरच आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आधारित बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

पंतप्रधान मोदींच्या बायोपिकमध्ये अभिनेता विवेक ओबेरॉय मोदींची भूमिका साकारणार आहे. या सिनेमाचा पहिला पोस्टर 7 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

अजूनतरी या सिनेमाचं टायटल 'पीएम नरेंद्र मोदी' असंच ठेवण्यात आलं आहे. बहुदा नंतर यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. या सिनेमाचं चित्रिकरण जानेवारीच्या मध्यापासून होणार आहे. आशा आहे की, हा सिनेमा 2019 च्या निवडणुकांअगोदर प्रदर्शित होईल. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका विवेक ओबेरॉय साकारत असल्यामुळे चाहत्यांना त्याच्या पहिल्या लूकची प्रतिक्षा आहे. चाहते आणि भाजप कार्यकर्ते विवेक ओबेरॉयला या लूकमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहे. 

देशातील राजकारण आणि त्याच राजकारणाच्या पटलावर असणाऱ्या नेतेमंडळींचा वावर, त्यांना असणारी लोकप्रियता याचा अंदाज घेत आता आणखी एका व्यक्तीमत्त्वाचा प्रवास रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे. तो प्रवास म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा. 

'बॉलिवूड लाइफ' या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार मोदींच्या आयुष्यावर साकारण्यात येणाऱ्या चित्रपटाच्या चित्रीकरणास लवकरच सुरुवात होणार आहे. अभिनेतार विवेक ओबेरॉय या चित्रपटातून पंतप्रधानांची व्यक्तीरेखा साकारणार असल्याचं कळत आहे. किंबहुना त्याने या चित्रपटासाठी स्वत:वर काम करण्यासही सुरुवात केली आहे. 

आतापर्यंतच्या चित्रपट कारकिर्दीत ही सर्वात आव्हानात्मक भूमिका असल्याचं खुदद् विवेकचंच म्हणणं आहे. त्यामुळे आता हे आव्हान तो कसं पेलतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दिल्ली, गुजरात, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या भागांमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होणार असल्याचं कळत आहे.