'हास्यजत्रे'नंतर विशाखाचा शार्प शूटर अवतार!

Vishakha Subhedar Ekda Yeun Tr Bagha : विशाखा सुभेदारचा हा नवा आणि हटके लूक तुम्ही पाहिलात का? सध्या होतेय त्याचीच चर्चा

दिक्षा पाटील | Updated: Oct 19, 2023, 12:57 PM IST
'हास्यजत्रे'नंतर विशाखाचा शार्प शूटर अवतार! title=
(Photo Credit : PR Handover)

Vishakha Subhedar Ekda Yeun Tr Bagha : लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री विशाखा सुभेदार सध्या तिच्या बेधडक आणि डॅशिंग अंदाजामुळे चांगल्याच चर्चेत आली आहेत. हातात गन घेतलेलं तिचं बेअरिंग आणि वेशभूषा पाहता एखाद्या खलनायकाची अथवा 'शूटर' ची  व्यक्तिरेखा ती साकारताना दिसणार आहे. तिचा हा ‘शूटर’ अंदाज आगामी हा कशा साठी आहे असा प्रश्न अनेकांना पडला असेलच. चला तर जाणून घेऊया विशाखा आता आपल्या सगळ्यांसाठी काय खास घेऊन येणार आहे. 

विशाखाचा हा लूक तिचा आगामी चित्रपट ‘एकदा येऊन तर बघा’ तील आहे. या चित्रपटात विशाखानं ‘मगरु’ या ‘शार्प शूटर’ ची भूमिका साकारली असून यात त्या 'डॅशिंग रावडी लूक' मध्ये दिसणार आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या भूमिकेबद्दल बोलताना विशाखानं सांगितलं की, ही अतिशय भन्नाट व्यक्तिरेखा आहे. ग्रे शेड असलेली भूमिका साकारताना मेकअप, बॉडी लँग्वेज, एक्स्प्रेशन्स या सगळ्यांकडे खास लक्ष द्यावं लागतं. भूमिका कोणत्याही प्रकारची असली, तरी ती चांगली व्हावी यासाठी कलाकारांना कष्ट घ्यावे लागतात. एकाच इमेजमध्ये अडकून पडायचं नसल्यानं ही वेगळी भूमिका स्वीकारल्याचं तिनं सांगितलं. येत्या 24 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद खांडेकरनं केलं आहे. या चित्रपटाची निर्मिती परितोष पेंटर, राजेशकुमार मोहंती, दिपक क्रिशन चौधरी, सेजल दिपक पेंटर यांची असून सहनिर्मिती अश्विन पद्मनाभन, सत्यनारायण मूरथी, डॉ.झारा खादर यांची आहे.  

हेही वाचा : ना बोलता येत होतं ना चालता येत होतं, डोळ्यांची उघडझापही थांबली अन्...; 'बिग बी'ना झालेला गंभीर आजार

विशाखासोबत या चित्रपटात गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे, भाऊ कदम, तेजस्विनी पंडित, पॅडी कांबळे, ओंकार भोजने, प्रसाद खांडेकर, राजेंद्र शिसातकर,  नम्रता संभेराव, वनिता खरात, शशिकांत केरकर, रोहित माने, सुशील इनामदार दिसणार आहेत. चित्रपटसृष्टीतील कसलेल्या कलाकारांची भली मोठी फौज या चित्रपटात आहे. गीते मंदार चोळकर यांची असून रोहन-रोहन, कश्यप सोमपुरा यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे. छायांकन योगेश कोळी तर संकलन निलेश गावंड यांचे आहे. कार्यकारी निर्माते मनोज अवाना तर लाईन प्रोड्युसर मंगेश जगताप आहेत. विनोदी अभिनेता प्रसाद खांडेकर 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शकीय पदार्पण करीत आहे.