नवरा असावा तर असा ! विराटने सगळ्यांसमोर पत्नीसाठी जे केलं, पाहणारे पाहतच राहिले

दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात हे नेहमीच पाहायला मिळतं. 

Updated: Feb 24, 2022, 12:38 PM IST
 नवरा असावा तर असा ! विराटने सगळ्यांसमोर पत्नीसाठी जे केलं, पाहणारे पाहतच राहिले title=

मुंबई : क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची जोडी सर्वाधिक चर्चेत असते. दोघांची बॉण्डिंग आणि केमिस्ट्री चाहत्यांना फार आवडते. 

अनुष्का आणि विराट यांच्या लग्नाला 5 वर्ष उलटली असली तरी त्यांच्यातील प्रेम दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात हे नेहमीच पाहायला मिळतं. 

एकमेकांसाठी आवर्जुन वेळ काढणारं हे कपल 'परफेक्ट कपल' म्हणून ओळखलं जातं.अनेकदा दोघांचे रोमॅन्टिक व्हिडिओ समोर येतात. आणि हे व्हिडिओ खूपच व्हायरल होतात. 

आता विराट आणि अनुष्काचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ एका सेटवरील आहे. नुकतीच दोघांनी एका जाहिरातीसाठी काम केलं आहे. 

जाहिरातीसाठी विराटने खास पंजाबी लूक केल्याचं ही बोललं जात आहे. दोघांनी या शूटनंतर एकत्र पोज देत काही फोटो क्लीक केले आहेत.

याच वेळी शूट करण्यात आलेला दोघांचा एक व्हिडिओ सगळ्यांचं लक्षवेधत आहे. या व्हिडिओत विराट आणि अनुष्का एकत्र फोटो क्लीक करताना कॅमेरासमोर मास्क काढतात. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सुरुवातीला विराट स्वत:चा मास्क काढतो आणि खिशात ठेवतो. मग तो लगेचच आपल्या लेडी लव्हला तिच्या हातात असलेला मास्क देण्यासाठी सांगतो. आणि तिचा मास्क आपल्या हातात ठेवतो. 

अनुष्कासोबत विराट कसा जेंटरमन प्रमाणे वागतो, हे पुन्हा एकदा पाहायला मिळालं आहे. फोटो काढून झाल्यानंतर तो पुन्हा एकदा तिला मास्क देतो. आणि मग दोघेही तेथून निघून जातात.

 मीडियासमोर देखील विराट आपलं कर्तव्य आणि अनुष्कासाठीची काळजी घेताना दिसून येतो. त्याचं हे वागणं पाहून अनेक महिला नवरा असावा तर असा अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया या व्हिडिओवर देत आहेत.