कोणीही विचार केला नसेल, पण प्रियांकाच्या बाळाच्या खोलीत 'ही' महत्त्वाची गोष्ट नेहमीच असते

 ज्याची एक झलक तिने दाखवली आहे.

Updated: Feb 24, 2022, 12:03 PM IST
 कोणीही विचार केला नसेल, पण प्रियांकाच्या बाळाच्या खोलीत 'ही' महत्त्वाची गोष्ट नेहमीच असते title=

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा आई झाल्यापासून प्रत्येकजण तिच्या बाळाची पहिली झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत. प्रियांकाने अद्याप आपल्या बाळाची झलक दाखवली नसली तरी सोशल मीडियावर तिने आपल्या चिमुकल्या बाळाच्या आगमनाने घराची काय अवस्था झाली आहे.याचा एक फोटो शेअर केला आहे. 

बाळासाठी प्रियांकाच्या नवीन घरात पाळणाघर तयार करण्यात आल्याचं बोललं जात आहे. ज्याची एक झलक तिने दाखवली आहे.

प्रियांकाने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती पती निक जोनाससोबत वेळ घालवताना दिसत आहे. घरी बनवलेल्या पाळणाघराची झलकही या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे.

एका खोलीत काही सॉफ्ट टॉय, खेळणी दिसत आहेत आणि बाल गोपाळही लोणी खाताना दिसत आहेत. कृष्णाचा मुर्ती सुद्धा बाळाच्या खोलीत ठेवण्यात आली आहे.

फोटोमध्ये प्रियांकाचे दोन सुंदर पेट डॉग दिसत आहेत. प्रियांकाने या फोटोंच्या कॅप्शनमध्ये फोटो डंप असे लिहिले आहे.

काही महिन्यापूर्वी प्रियांका आणि निकने त्यांच्या बाळाच्या जन्मापूर्वीच नवीन घर घेतल्याची बातमी समोर आली होती. या घराचं खास इंटीरिअर देखील करण्यात आलं होतं. ज्याचे काही फोटो प्रियांकाने सोशल मीडियावर शेअर केले होते.

नवीन घराची बातमी दिल्यानंतर तिने लगेचच बाळाच्या आगमनाची बातमी देखील शेअर केली होती. दोघांनीही आपलं कुटुंब वाढवायचं आहे हे लक्षात घेऊन कॅलिफोर्नियात घर विकत घेतलं.

मूल जन्माला आल्यानंतर त्याला खेळण्यासाठी भरपूर जागा मिळावी आणि घरात सुंदर वातावरण असावे, अशी त्यांची इच्छा होती.

प्रियांकाने काही काळापूर्वी सरोगसीद्वारे आई झाल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली.