मोहाली वनडेत दिसले विराट-अनुष्काचे पोस्टर

भारतीय क्रिकेट संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीला श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी आराम देण्यात आला. याचे कारण त्याचे लग्न. 

Updated: Dec 14, 2017, 11:38 AM IST
मोहाली वनडेत दिसले विराट-अनुष्काचे पोस्टर title=

मोहाली : भारतीय क्रिकेट संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीला श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी आराम देण्यात आला. याचे कारण त्याचे लग्न. 

मोहाली वनडेत विराट-अनुष्का

विराट बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासह विवाहबंधनात अडकलाय. असे असतानाही मोहाली वनडेत विराटचे फोटो दिसत होते. श्रीलंकेविरुद्धच्या मोहाली येथील दुसऱ्या वनडेत अनेक चाहत्यांच्या हातात विराट आणि अनुष्काचे पोस्टर्स पाहायला मिळाले.

मोहालीत एका चाहत्याच्या हातात विराट आणि अनुष्काच्या लग्नाचा फोटो होता. या फोटोत विराट वेड्स अनुष्का असे लिहिले होते. यावरुन विराटला त्याचे चाहते मिस करत असल्याचे दिसत होते. या सामन्यात भारताने श्रीलंकेला १४१ धावांनी हरवले. 

विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या टेस्टनंतर बीसीसीआयकडे वनडे आणि टी-२० सीरिजमध्ये सुट्टी मागितली होती. त्यानंतर इटलीमध्ये ११ डिसेंबरला विराट आणि अनुष्का विवाहबद्ध झाले. विराटने आपल्या लग्नाबाबत कमालीची गुप्तता पाळली होती. लग्नानंतर दोघांनी सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर केले.