Video : राम चरणसाठी कॉलेजमधल्या मुलींची तुफान हाणमारी; तरुणींचा एकमेकींना खाली पाडण्याचा प्रयत्न

Ram Charan : दाक्षिणात्य अभिनेता राम चरणची लोकप्रियता एवढी वाढली आहे की त्याच्यासाठी दोन मुली एकमेकांच्या जीवावर उठल्या. व्हायरल व्हिडीओमध्ये कॉलेजमधल्या दोन्ही मुली एकमेकांच्या केस ओढताना दिसत होत्या.

Updated: Apr 2, 2023, 04:32 PM IST
Video : राम चरणसाठी कॉलेजमधल्या मुलींची तुफान हाणमारी; तरुणींचा एकमेकींना खाली पाडण्याचा प्रयत्न title=

Viral Video : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार राम चरण (South star Ram Charan) सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. आरआरआर (RRR) चित्रपटाने राम चरणला वेगळीच ओळख निर्माण करुन दिली आहे. दक्षिण भारतासह जगभरात राम चरणचे लाखो चाहते आहेत. हैदराबादच्या (hyderabad) श्रीमंतांच्या यादीतही राम चरण वरच्या स्थानी आहे. राम चरणची लोकप्रियता इतकी आहे की त्याचे चाहते त्याच्यासाठी हाणामारीपर्यंत ( fighting) उतरले आहेत. अशाच दोन कॉलेजमधल्या मुलींचा हाणामारी करतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

दाक्षिणात्य अभिनेता राम चरण याच्यासाठी दोन मुली एकमेकांशी भांडत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कॉलेजमध्ये जाणाऱ्या दोन्ही मुली व्हायरल व्हिडीओमध्ये एकमेकांचे केस ओढताना दिसत आहेत. दोन्ही मुलींचे सहकारी भांडण थांबवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र दोघेही कोणाचेही ऐकण्याचा मनस्थितीत नव्हत्या. अभिनेता राम चरणसाठी दोघींनी एकमेकांचे अक्षरक्षः केस उपटण्याचा प्रयत्न केला.

हा व्हिडीओ कुठला आहे हे अद्याप समोर आले नसले तरी तो आंध्र प्रदेशातील असल्याचे म्हटले जात आहे. कारण या मुली तेलुगूमध्ये बोलत असल्याचे व्हिडीओमध्ये ऐकू येत आहेत. राम चरणसाठी अशा प्रकारे मारामारी केल्यामुळे सोशल मीडियावर दोन्ही मुलींची खिल्ली उडवली जात आहे. "राम चरण या मुलींना त्यांच्या लढाईनंतर बक्षीस देईल आणि टाळ्या वाजवेल अशी प्रतिक्रियाही युजर्सनही दिल्या आहेत.

तर दुसऱ्या एका युजरने हा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह पसरवण्यात आल्याचे म्हटले आहे. विजय नावाच्या ट्विटर युजरने हा व्हिडीओ खोटा असल्याचे म्हटले आहे. हे 2021 मध्ये घडले होते.  त्या दोघांमध्ये राम चरण किंवा इतर कोणत्याही मुलाबद्दल नव्हे तर एका वादानंतर त्यांच्यात भांडण सुरु होते. अनकपल्ली (विझाग) येथे हा सर्व प्रकार घडला, असल्याचे विजयने म्हटलं आहे.

आतापर्यंत हा व्हिडीओ 74 हजार लोकांनी पाहिला असून 450 पेक्षा जास्त युजर्सने हा व्हिडीओ लाईक केला आहे.

दरम्यान, आरआरआर चित्रपटाच्या नाटू नाटू या गाण्याने भारताला ऑस्कर मिळवून दिला आहे. अभिनेता राम चरण या चित्रपटात मुख्य भूमिकेत होता. वडील चिरंजीवी यांच्या पाऊलावर पाऊल टाकत राम चरणने तेलगु चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. राम चरणने 2007 मध्ये ‘चिरुथा’नावाचा पहिला चित्रपट केला होता. ऑस्कर विजेते एस. एस. राजामौली याच्यासह राम चरणने ‘मगधीरा’ नावाचा चित्रपट केला होता. या चित्रपटाने राम चरणला लोकप्रियता मिळवून दिली होती.