सलमान खानने लावलेल्या 'रेस' मध्ये कोण जिंकलं?

कुणासोबत लावली रेस... 

सलमान खानने लावलेल्या 'रेस' मध्ये कोण जिंकलं?  title=

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता सलमान खानचा 'रेस 3' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली कमाई करत आहे. फक्त 3 दिवसांत या सिनेमाने 100 करोडची कमाई केली आहे. रेस 3 चा अभिनेता सलमान खानने असा एक कारनामा केला आहे की ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 

या व्हिडिओत दबंग सलमान खान एका घोड्यासोबत रेस लावताना दिसत आहे. मैदानात सलमान खान आणि दुसऱ्या बाजूला घोडेस्वार रेस लावली आहेत. हा व्हिडिओ अनेक ठिकाणी व्हायरल होत आहे. व्हिडिओ भरपूर इंटरेस्टिंग असून सलमान खानने यामध्ये देखील काहीतरी हटके केलं आहे. 52 वर्षाचा सलमान खान घोड्यासोबत रेस लावत असलेला पाहून आपण अंदाज लावू शकतो की तो किती फिट आहे. 

रेस 3 चित्रपट रिलीज होऊन आता 6 दिवस झाले आहेत. मात्र बॉक्सऑफिसवर या चित्रपटाची पकड अजूनही दमदार आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाने 142.01 कोटींची कमाई केली आहे. बॉक्सऑफिसवरील घौडदौड पाहता या विकेंडला बॉक्स ऑफिसवर 150 कोटींचा पल्ला पार करू शकतो. जगभरातील रेस 3 चं कलेक्शन पाहता या चित्रपटाने 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. मेट्रो सिटीमध्ये या चित्रपटाची घौडदौड कमी झालेली असली तरीही लहान शहरातील सिंगल स्क्रिनवर याअ चित्रपटाचा जलवा कायम आहे.