मुंबई : इंडस्ट्रीमध्ये आपल देखील मोठ नाव असावं अशी प्रत्येक उभरत्या कलाकाराची इच्छा असते. मायानगरीत अनेकांच्या स्वप्नांना उंच भरारी घेण्याचं बळ मिळतं, तर काहींच्या नशीबात मात्र निराशा येते. पण एक अभिनेता असा आहे, ज्याला बाथरुमबाहेर रांगेत उभं असताना अभिनय करण्याची संधी मिळाली. हा नशीबवान अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता विक्रांत मेसी आहे. खुद्द अभिनेत्याने एका मुलाखीतीत त्याच्या आयुष्यातील हा किस्सा सांगितलं आहे.
विक्रांतने आयुष्यातील काही क्षण आठवले जेव्हा तो मुंबईतील एका रेस्टॉरंटच्या बाथरुमच्या रांगेत होता आणि रंगेत उभा असताना अभिनेत्याला एका शोसाठी ऑफर मिळाली. त्या दिवसानंतर अभिनेत्याने कधीही मागे वळून पाहिलं नाही.
अभिनेता म्हणाला, 'मी बाथरुमबाहेर रांगेत उभा होतो आणि एक महिला माझ्याकडे आली. तिने विचारलं, 'तू अभिनय करशील का?' मी होकार दिल्यानंतर त्यांनी मला ऑफिसमध्ये यायला सांगितलं.
विक्रांत पुढे म्हणाला, 'मी एका महिन्यात 4 एपिसोड शूट करणार होते. एका एपिसोडसाठी मला 6 हजार रुपये मिळणार होते. मला अभिनेता होण्याची प्रचंड इच्छा होती आणि संधी माझ्याकडे चालून आली होती...'
विक्रांत 'मुंबईकर'मध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये विजय सेतुपती देखील आहे. संतोष सिवन दिग्दर्शित हा तमिळ सिनेमा मनानगरमचा रिमेक आहे. विक्रांत सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.