दीपिका पदुकोणसोबत दिसणार हा अभिनेता

पाहा कोण आहे हा अभिनेता 

दीपिका पदुकोणसोबत दिसणार हा अभिनेता  title=

मुंबई : दीपिका पदुकोण लग्नानंतर पुन्हा एकदा कामाकडे मोर्चा रंगवला आहे. दीपिकाच्या नव्या सिनेमाचे कायम काहीना काही अपडेट येत असतात. दीपिका लवकरच मेघना गुलजार यांच्या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचं नाव ठरलं आहे. 

'छपाक' असं या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमाची गोष्ट अॅसिड पीडित लक्ष्मीवर आधारित आहे. सिनेमाची लीड अभिनेत्रीसोबत आयुष्मान खुराना आणि राजकुमार राव यांच्यात चुरस रंगली आहे. 

काही दिवसांपूर्वी अशी माहिती समोर आली होती की,  राजकुमार रावला हा सिनेमा मिळाला आहे. पण आता अशी माहिती समोर आली आहे की, हा सिनेमा मात्र दुसऱ्या अभिनेत्याच्या हाती लागला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#Mirzapur #YehHaiMirzapur @primevideoin @excelmovies @battatawada #PankajTripathi

A post shared by Vikrant Massey (@vikrantmassey87) on

आता हा सिनेमा राजकुमार रावच्या हातून निघाला असून नव्या हिरोच्या हाती गेली आहे. या सिनेमांत आता विक्रांत मेसी दिसणार आहे. मेघना गुलजार यांनी दिलेल्या माहितीनुसार या सिनेमाची कास्ट आता फायनल होत आहे.

विक्रांत मेसी या अभिनेत्याचं नाव या सिनेमाकरता ठरलं आहे. मेघना म्हणाल्या की, राझीपासूनच माझ्यासमोर विक्रांत हे नाव होतं.

'अ डेथ इन द गंज' या सिनेमानंतरच मला विक्रांतसोबत काम करायचं होतं. या सिनेमात विक्रांत एका नॉर्थ इंडियन मुलाची भूमिका साकारत आहे. 

जो ऍसिड वायलेंसशी संबंधित कॅम्पेन सुरू करतो. आणि त्याची ओळख लक्ष्मीशी होते. आणि पुढे ती गोष्ट सरकते. 

या सिनेमाचं शुटिंग मुंबई आणि दिल्ली होणार असून अद्याप रिलीज डेटचा कोणताही खुलासा झालेला नाही. पण या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.