राकेश शर्मांच्या बायोपिक मध्ये विकी कौशलची वर्णी

शाहरुख खानने सुध्दा सिनेमासाठी नकार दिला आहे.

Updated: Jan 27, 2019, 04:17 PM IST
राकेश शर्मांच्या बायोपिक मध्ये विकी कौशलची वर्णी title=

मुंबई: 'उरी' सिनेमाच्या दमदार यशानंतर आता अभिनेता विकी कौशल लवकरच 'सारे जहां से अच्छा' सिनेमात झळकणार आहे. अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. सिनेमात राकेश शर्मा साकारण्यासाठी शाहरुख खानची निवड करण्यात आली होती. अमिर खान नंतर सिनेमासाठी शाहरुख खानच्या नावाची चर्चा होती. दोन्ही खानच्या नकारा नंतर आता सिनेमात विकी कौशलची वर्णी लागणार आहे. निर्मात्यांच्या सांगण्यानुसार विकी कौशल सिनेमाला योग्य न्याय देवू शकतो. पण याबाबत अजुन काणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा झाली नाही. 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

This was almost going to be a picture without a caption... #thestruggleisreal

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

सिनेमाचे लेखक अंजुम राजाबली यांना शाहरुख खानच्या सिनेमा न करण्याचे कारण विचारलेल तेव्हा त्यांनी सांगितले, ' समोर येणाऱ्या सर्व बातम्या खोट्या आहेत. सिनेमाची शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. राकेश शर्मा हे अंतराळात जाणारे पहिले भरतीय आहेत'.असे ते म्हणाले. शहारुख खान सध्या फरहान अख्तरच्या 'डॉन ३' सिनेमात काम कण्यात इच्छूक आहे.

2018 हे वर्ष शाहरुख साठी काही उत्तम राहिले नाही. त्याचा झिरो सिनेमा चाहत्यांचे मनोरंजन करण्यात पात्र ठरला नाही. एकापाठोपाठ फ्लॉप सिनेमांमुळे त्याचे बॉलिवूडमध्ये टिकणे कठीण झाले. त्यामुळे त्याला एका मोठ्या सिनेमाची गरज होती. डॉन 1 आणि डॉन 2 सिनेमांनी प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन केले. आता 'डॉन 3' च्या मध्यमातून शाहरुख पुन्हा एक हिट सिनेमा करण्याच्या तयारीत आहे.