VIDEO ट्रेलर : स्वतःच्याच प्रेमात पाडणारा 'हंपी'

ललित प्रभाकर, सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता माळी, प्रियदर्शन जाधव अशी यंग स्टारकास्ट घेऊन येतोय 'हंमी'... या सिनेमाचा ट्रेलर पदर्शित करण्यात आलाय. 

Updated: Oct 31, 2017, 01:06 PM IST
VIDEO ट्रेलर : स्वतःच्याच प्रेमात पाडणारा 'हंपी' title=

मुंबई : ललित प्रभाकर, सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता माळी, प्रियदर्शन जाधव अशी यंग स्टारकास्ट घेऊन येतोय 'हंमी'... या सिनेमाचा ट्रेलर पदर्शित करण्यात आलाय. 

'एक सुंदर शहर आपलं आयुष्यदेखील सुंदर करू शकतं! अशा काही जागा सुंदर असतातच पण त्या संस्मरणीय व्हायला माणसच लागतात' अशा अतिशय अनवट धाग्यावर बेतलेला आगामी मराठी चित्रपट म्हणजे 'हंपी'... या चित्रपटात हंपी हे फक्त एक शहर नसून एक अतिशय सकारात्मक असं व्यक्तिमत्त्व आहे.
'हंपी' या सिनेमाचं पोस्टर आणि टिझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलंय. त्यानंतर आता या चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लॉन्च सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. 

चित्रपटात निराशाग्रस्त ईशा (सोनाली कुलकर्णी) फिरायला म्हणून हंपीला येते आणि तिचं आयुष्यच आमूलाग्र बदलते. मुळात ती हंपीला का जाते? तिथे ती काय करते? तिला तिथे कोण आणि कसे लोक भेटतात? याची उत्तरं १७ नोव्हेंबरला प्रेक्षकांना मिळतील. 

'हंपी' ही प्रेमकथा आहे की इतरांपेक्षा स्वतःलाच स्वतःच्या प्रेमात पाडणारी कलाकृती आहे की या दोन्ही गोष्टींचा सुंदर मिलाफ आहे हे अदिती मोघे यांच्या सुंदर कथा-पटकथा-संवाद आणि प्रकाश कुंटे यांच्या दिग्दर्शनातून उलगडत जाईल.  प्रकाश कुंटेच्या आधीच्या कलाकृतींना प्रेक्षकांनी मनापासून पसंती दिली होती आणि आता प्रेक्षक त्याच्या नव्या कलाकृतीची वाट पाहत आहेत. वैभव जोशी आणि ओंकार कुलकर्णी यांनी लिहिलेल्या गीतांना, नरेंद्र भिडे आणि आदित्य बेडेकर यांनी संगीत साज चढविला आहे.