अभिनेत्री शहनाज गिलचं विवाहाबाबत मोठं वक्तव्य; लवकरच अडकणार लग्नबंधनात?

शहनाज गिलचं फॅनफॉलोइंग खूप मोठं आहे.

Updated: Jul 30, 2022, 09:13 PM IST
अभिनेत्री शहनाज गिलचं विवाहाबाबत मोठं वक्तव्य; लवकरच अडकणार लग्नबंधनात?  title=

मुंबई : शहनाज गिलचं फॅनफॉलोइंग खूप मोठं आहे. गेले बरेच दिवस  ती जणू कुठेतरी हरवली होती. सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर अभिनेत्री खूप अस्वस्थ होती. पण आता हळुहळू ती खुलून पुन्हा आयुष्य जगू लागली आहे. आता अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या लग्नाबद्दल उघडपणे सांगितलं आहे.

वास्तविक, नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो मसाबा गुप्ताने तिच्या अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मसाबा आणि शहनाज एकमेकांना प्रश्न विचारताना दिसत आहेत. सर्वप्रथम मसाबा शहनाजला विचारते, "शहनाजला सना का म्हणतात?" या प्रश्नाला उत्तर देताना तिने सांगितलं की, माझ्या आई-बाबांना मी जन्माला आली तेव्हाचं वाटलं होतं की, शहनाज गिल एक ब्रँड होणार आहे म्हणून त्यांनी मला दुसरं नाव ठेवलं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शहनाज पुढे म्हणाली की, 'मी चांगली लिसनर नाही, त्यामुळे माझ्याशी जो मुलगा लग्न करेल त्याला माझं ऐकून घ्यावं लागेल. आणि माझी स्तुती करावी लागेल, त्यानंतर शहनाज मसाबाला म्हणते, तू मला लग्नाचे प्रश्न का विचारते आहेस, तू पकून जाशील यार'. यानंतर मसाबा शहनाजला विचारते की शहनाजचं 'Character More' का आहे? याला उत्तर देताना शहनाज म्हणते, 'कॅरेक्टर लेसचं उलटं कॅरेक्टर  मोर' होतं. यानंतर मसाबाने शहनाजला विचारलं, "माझ्याशी लग्न करशील?" यावर शहनाजने मजेशीर उत्तर देते आणि म्हणते. ''हो ठीक आहे, तुमचा बायोडाटा पाठवा, मात्र मला सहन करणं खूप कठीण आहे”.