इशा अंबानीच्या प्री- वेडिंग सोहळ्याचा ऐश्वर्या- अभिषेकला फटका

जाणून घ्या काय आहे त्यामागचं कारण 

इशा अंबानीच्या प्री- वेडिंग सोहळ्याचा ऐश्वर्या- अभिषेकला फटका title=

मुंबई : बिझनेसमन मुकेश अंबानी यांच्या मुलीचं ईशा अंबानीचं लग्न 12 डिसेंबर रोजी आयोजित केलं आहे. प्री वेडिंग सेरेमनी राजस्थानच्या उदयपुरमध्ये आयोजित केली होती. यावेळी बी टाऊनमधील सगळेच सितारे उपस्थित होते. अनेक कलाकारांनी यावेळी परफॉर्म देखील केलं. 

अभिषेक बच्चन आणि पत्नी ऐश्वर्या रायने देखील ईशाच्या प्रीवेडिंग सेरेमनीमध्ये डान्स केला. त्यांच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. युझर्सने या व्हिडिओवरून अभिषेक बच्चनला खूप ट्रोल केलं आहे. 

 या प्री वेडिंग सेरेमनीला शाहरूख खान, आमिर खान, करण जोहर, ऐश्वर्या राय बच्चन, प्रियंका चोप्रा, सलमान खान, दीपिका पदुकोण आणि वरूण धवन सारखे अनेक कलाकार उपस्थित होते. परदेशातून अमेरिकन गायक बियॉन्सेदेखील कार्यक्रमाची शोभा वाढवली.

वयाच्या 73 व्या वर्षी जावेद अख्तर डान्स करताना दिसत आहे. बहुदा हा पहिला कार्यक्रम असेल जेव्हा जावेद अख्तर कोणत्या तरी कार्यक्रमात डान्स करताना दिसत आहे. ईशा आणि आनंद पीरामल यांच लग्न 12 डिसेंबर रोजी मुंबईत होणार आहे.

ईशा आणि आनंद यांच शिक्षण एकत्र झालं आहे. दोघांच बालपण एकत्र गेले असून बराच काळ एकत्र घालवला आहे. महाबळेश्वरला आनंदने ईशाला याचवर्षी प्रपोझ केलं असून त्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. सप्टेंबरमध्ये इटलीच्या लेक कोमोमध्ये दोघांचा साखरपुडा पार पडला.