VIDEO : जया बच्चन यांनी रेखाला घरी जेवायला बोलवलं अन् मग.., Amitabh आणि Rekha यांचं झालं Break Up

Amitabh Bachchan Rekha Love Story : बॉलिवूडमधील सर्वात फेमस लव्हस्टोरी म्हणजे बिग बी आणि रेखा यांची...आजही अनेकांना वाटतं की अमिताभ आणि रेखा यांचं लग्न व्हायला हवं होतं. पण अमिताभ यांनी जया यांच्याशी लग्न केलं. 

Updated: Jan 23, 2023, 12:14 PM IST
VIDEO : जया बच्चन यांनी रेखाला घरी जेवायला बोलवलं अन् मग.., Amitabh आणि Rekha यांचं झालं Break Up title=
Video Jaya Bachchan invites Rekha for dinner and then Amitabh and Rekha affair break up Love Story end marathi news

Amitabh Bachchan Rekha Break Up : बॉलिवूडमध्ये (Bollywood News) सगळ्यात गाजलेलं अफेयर (affair) होतं ते म्हणजे बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन आणि एव्हरग्रीन रेखा (Amitabh Bachchan Rekha) यांचं...आजही या लव्हस्टोरीची चर्चा रंगते. तर अमिताभ आणि रेखा यांच्या चाहत्यांना आजही वाटतं की या दोघांचं लग्न व्हायला हवं होतं. अमिताभ आणि रेखा यांची ऑन स्क्रीन लव्ह स्टोरी पाहणे चाहत्यांना आजही आवडते. जया भादुरी म्हणजे जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्याशी अमिताभ यांचा विवाह झाला. जया बच्चन यांच्या एका वाक्याने अमिताभ आणि रेखा यांचं ब्रेकअप झालं. 

बॉलिवूडमध्ये रंगली अफेयरची चर्चा

बॉलिवूडमधील सूत्रांनुसार असं म्हटलं गेलं की, अभिनेत्री रेखा (Amitabh Bachchan Rekha Love Story) कुठल्याही चित्रपटाचं काम संध्याकाळपर्यंत पूर्ण करायच्या. कारण रेखा यांना संध्याकाळचा वेळ हा अमिताभ यांच्यासोबत घ्यालवायला आवडायचा. पुढे जाऊन जया बच्चन यांना रेखा आणि अमिताभ यांच्या अफेअरबद्दल समजलं. अशावेळी जया बच्चन यांनी मोठं पाऊल उचलं. 

रेखा यांना घरी जेवायचं निमंत्रण दिलं अन् मग...

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एकदा बिग बी शूटिंगच्या निमित्ताने शहराबाहेर गेले होते. त्यावेळी जया बच्चन यांनी रेखा यांना फोन केला आणि घरी जेवायला बोलवलं. जया यांचा फोननंतर रेखा यांना धक्काच बसला. रेखा घाबरल्या होत्या.  त्यांना असं वाटलं की आता जया बच्चन आपल्याला खरंखोटं ऐकवतील. त्यामुळे त्या घाबरतचं जया बच्चन यांच्या घरी गेल्या. (Video Jaya Bachchan invites Rekha for dinner and then Amitabh and Rekha affair break up  Love Story  end marathi news)

 

हेसुद्धा वाचा - Amitabh Bachchan यांचं पहिलं प्रेम राहिलं अधुरं, जयासोबत नाही तर 'या' मराठी मुलीशी करायचं होतं लग्न

 

जया असं काय बोलल्यात की...

पण झालं उलटचं जया बच्चन यांनी रेखाचं छान स्वागत केलं. रेखा आणि जया यांनी एकत्र खूप छान वेळ घालवला. जेव्हा रेखा जेवण करुन निघाल्यात तेव्हा जया या त्यांना दारापर्यंत सोडण्यासाठी आल्या. त्यावेळी त्या रेखाला म्हणाल्या की, 'काहीही झालं तरी मी अमिताभ यांना सोडणार नाही.' जया बच्चन यांचा ठाम निर्णय ऐकून रेखा यांना समजलं की, आता अमिताभ यांच्यापासून दूर जाण्याची वेळ आली आहे.

रेखा यांनी कधीच...

 त्यानंतर रेखा आणि अमिताभ यांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर अमिताभ यांच्याकडे रेखा यांनी कधीच वळून पाहिलं नाही. चाहत्यांनीही या घटनेनंतर अमिताभ आणि रेखा यांना ऑन स्क्रीनदेखील पाहिलं नाही. कुठल्याही अवार्ड फंक्शनला ते एकमेंकाशी बोलतानाही दिसले नाहीत.