लग्नानंतर विकीला शूटिंगमधून ब्रेक मिळताच करतो ही गोष्ट, व्हिडीओ तुफान व्हायरल

लग्नानंतर विकीला शूटिंगमधून वेळ मिळताच विकी काय करतोय पाहा व्हिडीओ 

Updated: Jan 23, 2022, 07:20 PM IST
लग्नानंतर विकीला शूटिंगमधून ब्रेक मिळताच करतो ही गोष्ट, व्हिडीओ तुफान व्हायरल title=

मुंबई : विकी कौशल सध्या कतरिनासोबतच्या लग्नांमुळे खूप चर्चेत आहे. याशिवाय बॉलिवूडमधील सर्वात बिझी स्टार म्हणून देखील हा प्रसिद्ध आहे. यंदा विकीचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

आपल्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून विकी नवीन गोष्टी करत असतो. लग्नानंतर शूटिंग दरम्यानच्या ब्रेकमध्ये विकी कौशल काय करतो हे एका व्हिडीओमधून समोर आलं आहे. विकी कौशल शूटिंगच्या मधल्या वेळेत क्रिकेट खेळताना दिसला आहे. 

आपल्या कामाच्या गडबडीमध्ये तो खेळायचं विसरला नाही. विकी कौशल सध्या इंदूरमध्ये त्याच्या नवीन चित्रपटाचे शूटिंग करत आहे. या चित्रपटात त्याची नायिका सारा अली खान आहे. 

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान विकी कौशलने टीमसोबत क्रिकेट मॅच खेळली. विकीने त्याचा व्हिडीओ त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. विकीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकांनी लाईक केला आहे. हा व्हिडीओ वेगानं व्हायरल होत आहे. 

विकी कौशलने कतरिनासोबत लग्न केलं. या दोघांचे फोटो आणि शाही लग्न हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय होता. खास लोकांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा विवाह सोहळा पार पडला होता.