तैमूर अली खानच्या केअरटेकरला मिळतो गलेलठ्ठ पगार, किंमत एकून बसेल धक्का

 बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी करीना कपूर खान आणि सैफ अली खान नेहमीच चर्चेत असतात. 

Updated: Jan 23, 2022, 07:02 PM IST
तैमूर अली खानच्या केअरटेकरला मिळतो गलेलठ्ठ पगार, किंमत एकून बसेल धक्का title=

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी करीना कपूर खान आणि सैफ अली खान नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्यासोबत त्यांची मुलंही प्रसिद्धीचा एक भाग आहेत. करीना कपूरचा लाडका तैमूर अली खान सध्या चर्चेचा बादशहा बनला आहे. लहानपणापासूनच प्रसिद्ध झालेला तैमूर पापाराझींची पहिली पसंती आहे.

फिल्मी दुनियेत अनेक स्टार किड्स आहेत. पण तैमूरची गोष्ट वेगळी आहे. या छोट्या नवाबचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर आगीसारखे पसरतात. क्यूटनेसच्या बाबतीतही तैमूर बाकीच्या स्टार किड्सपेक्षा पुढे आहे. तैमूरची काळजी घेणं किती महागडे आहे हे तुम्हाला माहिती आहे का? लहानपणापासूनच लोकांच्या नजरेत असलेल्या तैमूर अली खानला सांभाळणे नक्कीच अवघड काम आहे. त्यामुळे तैमूरची काळजी घेण्यासाठी करीना आणि सैफने नानी ठेवली आहे. तैमूरच्या नानीचा पगार जाणून तुम्हीही चकित होवून जाल.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, करीना आणि सैफचा लाडका तैमूर अली खानची काळजी घेणाऱ्या नॅनीला दर महिना 1 लाख 50 हजार रुपये पगार मिळतो. तैमूरवर सतत नजर ठेवण्यासाठी नॅनीला मोठी रक्कम दिली जाते. एवढंच नाही तर ओव्हरटाईमसाठी नॅनीला 25 हजार रुपये वेगळे दिले जातात. पतौडी घराण्यातील छोट्या नवाबाची काळजी घेण्यासाठी दर महिन्याला लाखो रुपये खर्च केले जातात.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, तैमूरची काळजी घेणाऱ्या नॅनीला मोठमोठ्या रकमेव्यतिरिक्त इतर सुविधाही दिल्या जातात. रिपोर्ट्सनुसार, नॅनीला एक पर्सनल कारही देण्यात आली आहे. या कारमध्ये ती अनेकदा तैमूरला फिरायलाही घेवून जाते. सैफ अली खान आणि करीना कपूरचा तैमूर देखील सोशल मीडिया सेन्सेशन आहे.