भाषा कोणतीही असो 'आई' शब्दासारखा गोडवा कशातच नाही... विकी कौशलच्या पोस्टनं वेधलं लक्ष

Vicky Kaushal Mother : सध्या चर्चा आहे ती म्हणजे विकी कौशल या अभिनेत्याची. तुम्हाला माहितीये का की सध्या विकीनं आपल्या सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. नक्की असं काय केलंय त्यानं चला तर मग जाणून घेऊया. 

गायत्री हसबनीस | Updated: Sep 19, 2023, 05:59 PM IST
भाषा कोणतीही असो 'आई' शब्दासारखा गोडवा कशातच नाही... विकी कौशलच्या पोस्टनं वेधलं लक्ष title=
vicky kaushal call her mother aai netizens reacts on instagram

Vicky Kaushal Mother : विकी कौशल हा आपल्या अभिनयासाठी चांगलाच ओळखला जातो. यावर्षी त्याचा 'जरा हटके जरा बचके' हा सारा अली खानसोबत आलेला चित्रपटही प्रचंड गाजला होता. त्यातील 'तेरे वास्ते' हे गाणंही प्रचंड गाजलं होतं.  त्याची आणि कतरिना कैफची कायमच चर्चा होताना दिसते. यावर्षी डिसेंबरमध्येही त्याच्या आणि कतरिनाच्या लग्नाला 2 वर्षे पुर्ण होतील. त्यांच्या अफेअरची जोरात चर्चा रंगलेली होती. विकी कौशलचाही भाऊ सनी कौशलही या क्षेत्रात सक्रिय आहे.

विकी आपल्या परिवारासोबतही आपले फोटो हे शेअर करताना दिसतो. कतरिना, विकी आणि त्याचे आईबाबाही त्यांच्यासोबत क्यूट फोटो शेअर करताना दिसतो. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली असते. आता विकी कौशलच्या आपल्या आईसोबतचा एक क्यूट फोटो पाहायला मिळतो आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. 

तुम्ही म्हणाल काय असं काय नवीन आहे. पण तुम्हाला आम्ही अशीच एक खास नवीन गोष्टच सांगणार आहोत. त्यातून तुम्हाला हा फोटो पाहून आश्चर्यच वाटेल कारण पंजाबी आईसाठी विकी कौशलनं मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे त्याच्या या फोटोतील कॅप्शन पाहून तुम्हालाही त्याचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. दोन दिवसांपुर्वी त्यानं आपल्या आईसोबत क्यूट फोटो शेअर केला होता. ज्यात तो आपल्या आईला गोड मिठी मारताना दिसतो आहे आणि त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलंय, 'Cutiepie आई'. त्याच्या या फोटोवर चाहत्यांच्या तूफान कमेंट्स आल्या आहेत. त्यामुळे त्याची विशेष चर्चा रंगलेली आहे. 

यावेळी सगळेच जणं त्याचं कौतुक करताना दिसत आहेत. त्याच्या या पोस्टखाली अनेकांनी त्याचे कौतुक केले आहेत. कोणी काय काय कमेंट केली आहे. चला पाहुया. एका नेटकऱ्यानं म्हटलंय की, ''You called ur mom आई!!wow'' तर दुसऱ्या एका युझरनं लिहिलंय की, ''You saying आई is like wow'' तर दुसऱ्या अशाच एका युझरनं म्हटलंय,'''आई 'ह्या शब्दात किती मातृत्व दडलंय ना... मन अगदी तृप्त होतं.'' सध्या अनेकांनी त्याच्या या फोटोवर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

\

अशाच एका युझरनं म्हणटलंय की, ''आईला आई बोलून मन जिंकलस आमचं''तर दुसऱ्यानं म्हटलंय की, ''महाराष्ट्रमध्ये जास्त प्रमाणात आपल्या जन्मदातीला आई म्हणतात हीच आपली संस्कृती आहे'' तर तिसऱ्या एकानं म्हटलंय की, ''मी पण माझ्या आईला आई बोलते आणि माझा मुलगा पण मला आईच आवाज देतो'' तर अशाच एकानं म्हटलंय की, ''खुप छान भाऊजी''